हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सर्दी, खोकला, घशात होणारी खवखव असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यातील थंड वातावरण, धुके, वाढणारे प्रदूषण यांमुळे सतत होणारी सर्दी, खोकला, घशात होणारी खवखव यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
सर्दी, खोकला, घशाची खवखव यांपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
आणखी वाचा: मधुमेहाच्या रुग्णांची दृष्टी होऊ शकते कमकुवत; हे टाळण्यासाठी अशी घ्या डोळ्यांची काळजी
आयुर्वेदानुसार सर्दी, खोकला, घशाची खवखव यांपासून सुटका मिळवण्यासाठी आले फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदानुसार आल्यात अँटिऑक्सिडंट अँटी इन्फ्लामेंटरी, अँटिऑक्सिडंट या गुणधर्मांसह अनेक महत्त्वाची पोषकतत्त्व आढळतात ज्यामुळे सर्दी, खोकला, घशाची खवखव यांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत मिळते. यासाठी आल्याचा वापर कसा करावा जाणून घ्या.
- एक ग्लास पाण्यात एक इंच आले टाकून ते पाणी ३ ते ५ मिनिटं उकळून घ्या, त्यानंतर हे पाणी गाळून घेऊन पिऊ शकता. यामुळे सर्दीपासून सुटका मिळण्यास मदत होईल.
- एक लिटर पाण्यात अर्धा चमचा सुंठ पावडर मिसळा, त्यानंतर हे पाणी १५ ते २० मिनिटं कमी आचेवर उकळा. यामुळे सर्दी, खोकला, घशाची खवखव यांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत मिळते.
- दुपारच्या जेवणानंतर एक चिमूट आले पावडर ताकात मिसळून प्या. यामुळे अन्नपचन नीट होण्यास मदत मिळते, तसेच सर्दी, खोकला यांपासून सुटका मिळते.
- एका ग्लासमध्ये ५ मिली आल्याचा रस, एक चमचा मध, थोडे मीठ आणि काही लिंबाचे रस टाका. हे मिश्रण नीट मिसळून जेवणाच्या आधी अर्धा तास आधी प्या, यामुळे अन्नपचन नीट होण्यासह सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळण्यास मदत होते.
आणखी वाचा: हिवाळ्यात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान! जाणून घ्या फायदे
आल्यामध्ये उष्णता असते, त्यामुळे याची ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)