Winter Hair Care Tips: केस हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आपले केस लांब व मजबूत असावेत, केसांचे गळणे कमी व्हावे म्हणून महिला १०० उपाय करीत असतात. हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या केसांची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण- हिवाळ्यात केस मजबूत, रेशमी आणि चमकदार राखणे कठीण असते. केस गळणे, टाळूला खाज सुटणे व डोक्यातील कोंडा या केसांसंबंधीच्या हिवाळ्यातील काही सामान्य समस्या आहेत. हिवाळ्यात थंडीमुळे केस रुक्ष आणि कोरडे होतात. अशातच जर तुमचे केस कुरळे असतील, तर तुम्हाला अधिक त्रासाला सामोरे जावे लागते. कुरळे केस जाड आणि कोरडे झाल्याने तुटण्याची शक्यता असते. अशा वेळी केसांना योग्य पोषण आणि उपायांची गरज असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केस मजबूत व लांबसडक व्हावेत, यासाठी आपण कित्येक महागड्या ब्युटी प्रॉडक्टचा उपयोग करतो; पण त्यामुळे केसांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. केमिकलयुक्त ट्रीटमेंटऐवजी आपण पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते; ज्याद्वारे तुमच्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वांचा पुरवठा होईल आणि त्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यासही मदत मिळेल. हिवाळ्यात तुमच्या कुरळ्या केसांसाठी कोणत्या जीवनसत्त्वांची फार गरज आहे, याच विषयावर फोर्टिस हॉस्पिटलच्या सल्लागार डॉक्टर महिमा अग्रवाल यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

(हे ही वाचा: सोडा प्यायल्यानं यकृत होऊ शकते खराब? पाहा डाॅक्टर काय सांगतात…)

डॉक्टर म्हणतात, “हिवाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच आपल्या केसांमधील नैसर्गिक ओलावादेखील कमी होतो. त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात. परिणामी केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्येचाही सामना करावा लागतो. हिवाळ्यात थंडीमुळे केस रुक्ष व कोरडे होतात. तसे होऊ नये यासाठी आरोग्याला पोषक जीवनसत्त्वांचा पुरवठा व्हायला हवा. मग केस लांबसडक व मजबूत राहण्यास मदत मिळते. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे शाम्पू आणि कंडिशनर चांगला असणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे आहारातूनही केसांना आवश्यक घटक शरीरात जाण्याची आवश्यकता असते. त्यामध्ये जीवनसत्त्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो.”

“शरीरात जीवनसत्त्व डची कमतरता झाल्यास केस गळण्यामध्ये वाढ होते. केस कोरडे होणे किंवा केस कमकुवत होणे, या तक्रारी महिला आणि पुरुषांमध्ये समान प्रमाणात दिसून येतात. केस घनदाट होण्यासाठी जीवनसत्त्व ड आवश्यक असते. सूर्यप्रकाश, कॉर्डलिव्हर ऑइल, फॅटी फिश व मशरूम यामध्ये जीवनसत्त्व डचे प्रमाण जास्त असते. विशेष म्हणजे केसगळतीची समस्या दूर होऊन, केस मजबूत व सुंदर व्हावेत यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पूरक जीवनसत्त्व ड आणि इतर आवश्यक पदार्थांचा समावेश करू शकता.” असे ते सांगतात.

केसगळतीच्या समस्येवर जीवनसत्त्व ड फार गरजेचे आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कातून आपल्याला जीवनसत्त्व ड मिळते. उन्हाळ्यात तसे सूर्यप्रकाशात उभे राहणे कठीणच आहे. पण, जीवनसत्त्व ड मिळविण्यासाठी तुम्हाला दर दोन ते तीन दिवसांनी पाच ते १५ मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशाचा लाभ घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होईल. त्याचबरोबर फॅटी मासे, अंड्यातील पिवळा बलक यांचा आहारात समावेश करा. त्यातून तुम्हाला जीवनसत्त्व ड मिळेल, असेही त्या नमूद करतात.

 

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter hair care tips vitamins for strong hair these vitamins you should include in your diet for hair growth pdb
Show comments