Winter Health Tips: थंडीचा हंगाम जोरात सुरू आहे. बदलत्या हवामानासोबत आपली जीवनशैलीही बदलू लागली आहे. हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत लोक अनेक उपाय करतात. या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. बहुतेक लोक हिवाळ्यात आजारी पडतात. थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहाराच्या बाबतीतही तयारी करायला हवी. आहारात काही पदार्थांचा समावेश केला, तर ही थंडी नक्कीच सुखकर आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी होऊ शकेल. दैनंदिन आहारात काही गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरेल, असे मत हैदराबादच्या डाॅ. सुषमा कुमारी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवणारे सुपर फूड्स सांगितले असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डाॅक्टर सांगतात, “हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे संक्रमण आणि विषाणूजन्य ताप येण्याची शक्यता असते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतर लोकांपेक्षा कमकुवत असते, अशा लोकांना या आजारांपासून सर्वाधिक धोका असतो.” हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती लोखंडासारखी मजबूत करू शकणाऱ्या सुपर फूड्सविषयीची माहिती दिली आहे. जाणून घेऊ कोणते आहेत ते सुपरफूड्स…

cockroaches how to get rid of cockroaches by using home remedy rice helps to remove cockroaches jugaad
झुरळांचा त्रास आता कायमचा होईल गायब! ‘रात्रीचा भात’ वापरून होईल कमाल, पाहा जुगाडू उपाय
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ

हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवणारे सुपरफूड्स

१. लिंबूवर्गीय फळे

जीवनसत्त्व कसह समृध्द असलेले संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि अॅलर्जीच्या प्रतिक्रियांशी लढण्यासाठी उत्तम आहेत. हिवाळ्यात तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता. ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यात जीवनसत्त्व क असते; ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

(हे ही वाचा : १ लिटर पाण्यात प्लास्टिकचे अडीच लाख तुकडे! बाटल्यांतील पाणी प्यायल्यानं आतडे-हृदयाच्या आरोग्याचा धोका वाढतो? )

२. ब्रोकोली

जीवनसत्त्व अ आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना मानली जाणारी ब्रोकोली हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, एक कप ब्रोकोलीमध्ये संत्र्याइतकेच जीवनसत्त्व क मिळते. ब्रोकोलीमध्ये बीटा-कॅरोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त व लोह भरपूर प्रमाणात असते.

३. लसूण

हिवाळ्यात लसणाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. लसणामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात; जे सर्दी व फ्ल्यूसारख्या आजारांशी लढण्यास आणि प्रतिबंध करण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात लसूण खूप फायदेशीर आहे. कच्च्या लसणाच्या दोन पाकळ्या दिवसातून चघळल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

४. आले

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आले हे उत्तम सुपरफूड आहे. आले खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आल्यात जीवनसत्त्व क असते. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. जीवनसत्त्व क त्वचेसाठीही चांगले असते. आल्यामुळे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. जीवनसत्त्व ‘क’चा हा चांगला स्रोत आहे.

५. पालक

हिवाळ्यात थंडीमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. पालकामधील अँटी-ऑक्सिडंट्स, लोह व बीटा कॅरोटीन शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. पालकामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते हे तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, लोहाशिवाय जीवनसत्त्व अ, ब, क, कॅल्शियम, अमिनो व फॉलिक अॅसिडदेखील त्यात मुबलक प्रमाणात आढळते.

(हे ही वाचा : मनोज बाजपेयी रोज रात्री उपाशी का झोपतात? रात्रीचं जेवण वगळल्याने झपाट्याने वजन कमी होते? वाचा तज्ज्ञांचा सल्ला…)

६. दही

दही हे प्रो-बायोटिक असल्यामुळे ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले आहे. त्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व ब-१२ व फॉस्फरसदेखील मुबलक प्रमाणात असते. हिवाळ्यात आपल्या शरीरात अनेक प्रकारची संक्रमणे लवकर होतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणेही आवश्यक आहे.

७. नट्स आणि सीड्स

अनेक पोषक घटकांनी समृद्ध नट आणि सीड्स आरोग्य सुधारण्यास खूप मदत करतात. जर तुम्हाला हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात बदाम, अक्रोड व फ्लेक्स सीड्स इत्यादींचा समावेश करू शकता. त्यामध्ये खूप जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यांचे आरोग्याला खूप लाभ होतात. हिवाळ्यातल्या आहारात त्यांचा समावेश केल्यास नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, शरीराला पोषण मिळते, त्वचा तजेलदार होते, ऊर्जा वाढते आणि कायम राहते.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वरील सुपरफूड्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

Story img Loader