नाश्त्याची सवय आणि त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम हा नेहमीच आरोग्य आणि आहाराबाबत सजग असलेल्या लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. काही जण गरमागरम भाजलेला ब्रेड आणि अंडे, अशा नाश्त्याद्वारे आपल्या दिवसाची सुरुवात करतात; तर काही जण फक्त अंडे खाण्यास पसंती देतात. पण, प्रश्न असा पडतो की, अंडे खाण्याचा योग्य मार्ग काय आहे? फक्त अंडी खाण्यापेक्षा ब्रेडबरोबर अंडे खाल्ल्यास रक्तातील साखरेवर वेगळा परिणाम होतो का? हे तपासण्यासाठी कटेंट क्रिएटर करण सरीन यांनी दोन्ही प्रकारे अंडे खाऊन पाहिले. ब्रेडबरोबर अंडी खाताना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी २० पॉईंटसनी वाढली; जे चिंताजनक नव्हते. परंतु, फक्त अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत अजिबात वाढ झाली नाही. याबाबतच्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “हेच कारण आहे की, मला अंडी आवडतात. कारण- त्यामध्ये कोणतेही कार्बोहायड्रेट नसतात आणि प्रथिने व इतर पोषक घटकांनी ती समृद्ध असतात.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा