सोशल मीडियावर एकापेक्षा एक किचन आणि हेल्थसंबंधित हॅक्स सांगितले जातात. पण, आरोग्यासंबंधित कोणताही सल्ला अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर शेफ अजय यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असा दावा केला की, “आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मिरचीच्या देठांसह वापर केला पाहिजे, मग ती लाल मिरची असो किंवा हिरवी मिरची असो ती नेहमी देठासह वापरली पाहिजे. हे तुमच्या आतड्यांना पचनसंस्थेच्या त्रासापासून वाचवण्यास मदत करते.”

मिरची आणि आतडे यांचा काय संबंध आहे? (Chillies and gut: What’s the connection?)

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना दिल्ली धरमशिला नारायण हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी वरिष्ठ सल्लागार डॉ. महेश गुप्ता यांनी सांगितले की, “बहुतेक प्रकरणांमध्ये मिरचीमध्ये दाहकविरोधी प्रभाव असतो, जो आतड्यामध्ये निर्माण होणारा दाहकता कमी करण्यासाठी आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारख्या संभाव्य परिस्थिती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. “त्यांचे प्रतिजैविक गुणधर्म संतुलित आतड्यातील मायक्रोबायोम राखण्यात मदत करतात, जे संपूर्ण पाचन आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे,” असे डॉ. गुप्ता म्हणाले.

Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू

पण, उन्हाळ्यात मिरचीचे सेवन संतुलित प्रमाणात करणे आवश्यक आहे; कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या होऊ शकते. “कॅप्सॅसिनचा उच्च डोस पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतो, जठराची सूज किंवा ॲसिड रिफ्लेक्ससारख्या परिस्थिती वाढवू शकतो. उन्हाळ्यात जेव्हा गंभीररित्या पाण्याची पातळी कमी होते तेव्हा मिरचीचा लघवीचे प्रमाण वाढवणारा प्रभाव योग्यरित्या व्यवस्थापित न केल्यास निर्जलीकरणास कारणीभूत ठरू शकतो,” असे डॉ. गुप्ता म्हणाले.

हेही वाचा –श्वेता बच्चनने सांगितले अमिताभ आणि जया बच्चन यांच्या सौंदर्याचे रहस्य! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

देठासह मिरची खाणे खरंच फायदेशीर आहे का? (Is it really beneficial to eat chillies with stems?)

शेफ आशीष सिंग यांनी या हॅकशी असहमत असल्याचे सांगत, यामागे कोणतेही पाकशास्त्र नाही. सिंग म्हणाले, “तुम्ही देठासह मिरच्या खाऊन आहारातील तिखटाचे प्रमाण वाढवत आहे.

शेफ आणि लेखक अनल कोटक (Chef and author Aanal Kotak ) यांनीही याबाबत संभ्रम व्यक्त केला आणि ते म्हणाले, “जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणत्याही मिरच्यांमुळे पाचन समस्या उद्भवू शकतात आणि मूळव्याधदेखील होऊ शकते.

“मिरचीच्या देठासह संपूर्ण मिरची खाल्ल्याने एकूण कॅप्सेसिनचे सेवन थोडे कमी होऊ शकते, परंतु या पद्धतीमुळे तिखटपणाामुळे होणारी दाहकता किंवा अपचन कमी होण्यास मदत होत नाही, असे बंगलोरच्या ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटल, आहारतज्ज्ञ वीणा व्ही. यांनी सांगितले.

हेही वाचा –Menopause बाबत ‘या’ चांगल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी केला खुलासा

कॅपकेशियन हे तिखट चवीसाठी जबाबदार पदार्थ आहे, जो फक्त देठामध्ये नाही तर मिरचीमध्ये सर्वत्र आढळतो. “खरं तर काही प्रकारच्या मिरच्या आहेत, ज्यांच्या देठाजवळ त्याहूनही जास्त कॅप्सेसिन असते,” असेही वीणा यांनी नमूद केले.

“स्टेम स्वतः खूप उष्ण असू शकत नाही; ते मिरचीमध्ये कडू चव आणू शकते,” असे वीणा म्हणाल्या. “तुम्हाला तो कडवटपणा आवडत नसेल तर तुम्ही देठ काढून टाकू शकता, जेणेकरून तुमचा पदार्थ किती उष्ण आहे यावर परिणाम न करता त्याची चव चांगली राहील,” असे वीणा म्हणाल्या.

सिंग यांनी सांगितले की, “तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नसाल तर तिखटपणा कमी करण्यासाठी मिरचीतील बिया काढून टाका किंवा कमी प्रमाणात मिरच्या वापरा, जेणेकरून आतड्याचे आरोग्य चांगले राहील. तसेच वापरण्यापूर्वी मिरची थोडी हातात घेऊन (RUB) चोळून घ्या, जेणेकरून बिया सर्वत्र पसरतील. ही ट्रिक समान रीतीने तिखटपणा राखण्यास मदत करेल.”

कोटक पुढे म्हणाले की, बिया काढून टाकल्याने तिखटपणा ५० टक्क्यांपर्यंत खाली येतो. “मी देठांसह हिरवी मिरची वापरण्याची शिफारस करणार नाही, त्याऐवजी हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्या – जे आतून बिया काढून टाकतील – आणि नंतर तळून घ्या. या हॅकमुळे तिखटपणा कमी होईल,” असे कोटक म्हणाले.

हेही वाचा –तुम्ही कांदा कसा चिरता यानुसार बदलू शकते पदार्थाची चव; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

वीणा यांनी सामायिक केले की, तयारीची पद्धत आणि मिरचीचा प्रकारदेखील तिखटपणा आणि पाचन प्रभाव निर्धारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. “मिरची शिजवल्याने काही कॅप्सेसिन नष्ट होऊ शकतात, तर मिरचीच्या काही जातींमध्ये नैसर्गिकरित्या कॅप्सेसिनचे प्रमाण कमी असते आणि ते पचनसंस्थेवर सौम्य असतात.”

Story img Loader