Cashew Eating Benefits: काजू खाताना अनेकांना काजू सालीसह खावा की त्याशिवाय, असा कदाचित प्रश्न पडत असेल. हैदराबादमधील एल. बी. नगर येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यांच्या मते, सालीसकट किंवा सालीशिवाय अशा दोन्ही पद्धतींच्या काजूंचे फायदे आहेत.
सालीचे काजू
सल्लागार, आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या, “ज्या काजूंची त्वचा तपकिरी असते, ज्याला टेस्टा म्हणून ओळखले जाते, ते अतिरिक्त आरोग्यदायी फायदे देतात.”
डॉ. बिराली म्हणाल्या, “साल असलेले काजू कमी प्रक्रिया केलेले असतात आणि ते जास्त नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स टिकवून ठेवतात, ज्यामध्ये पॉलिफेनॉलचा समावेश असतो, जे ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढण्यास मदत करतात. साल असलेल्या काजूतून फायबरदेखील मिळते. त्यामुळे पचनास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्यही सुधारते. परंतु काजूच्या सालीमुळे काजूची चव थोडीशी कडू असू शकते.”
जास्तीत जास्त आरोग्यदायी फायद्यांसाठी सालीसहित हलके भाजलेले काजू चविष्ट लागतात. कारण- भाजल्याने कडवटपणा कमी होतो आणि काजूतील पोषक घटक टिकून राहतात.
साल काढलेले काजू
“साल काढलेले काजू त्याच्या सौम्य, चव व गुळगुळीत पोतामुळे अधिक प्रमाणात खाल्ले जातात. ते आरोग्यदायी असे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, प्रथिने आणि मॅग्नेशियम, जस्त व लोह यांसारख्या आवश्यक खनिजांनी समृद्ध आहेत. सालीमधील पॉलीफेनॉल त्यात नसले तरी ते हृदयाचे आरोग्य आणि ऊर्जा मिळविण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत,” असे डॉ. बिराली म्हणाल्या.
“जर चव आणि पोत यांना तुम्ही प्राधान्य देणार असाल, तर साल काढलेले काजू तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. ते बहुमुखी आहेत आणि बेकिंगपासून ते चविष्ट पदार्थांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरले जाऊ शकतात. “काजू सोलण्याची प्रक्रिया हे सुनिश्चित करते की, काजू खाण्यास सुरक्षित आहेत. कारण- बाहेरील कवचात काही विषारी पदार्थ असतात. तथापि, ही प्रक्रिया सालीतील काही फायदेशीर संयुगे काढून टाकते,” असे डॉ. मल्होत्रा म्हणाले.
“तुम्ही जे काही निवडाल, ते योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. काजूमध्ये कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे संतुलित पोषणासाठी योग्य प्रमाणाक खाणे आवश्यक आहे,” असे डॉ. बिराली म्हणाल्या.
योग्य काय के कसे ठरवायचे?
साल नसलेले काजू सामान्यतः खाण्यास आणि पचण्यास सोपे असतात. “साल असलेले काजू कधी कधी खराब असू शकतात. साल बोटांना चिकटून राहते किंवा दातांमध्ये अडकते. साल नसलेले काजू खाण्याचा अधिक सोईस्कर अनुभव देतात,” असे फिसिको डाएट अँड अॅस्थेटिक क्लिनिकच्या संस्थापक व आहारतज्ज्ञ विधी चावला म्हणाल्या.
गुळगुळीत पोत
साल नसलेल्या काजूची गुळगुळीत, क्रिमी पोत बटर, स्मूदी आणि इतर पाककृतींमध्ये मिसळण्यासाठी फायदेशीर आहे. “साल नसलेले काजू वेगवेगळ्या पदार्थांमध्ये जसे की स्टिअर-फ्राईज, सॅलड व बेक्ड पदार्थांमध्ये सहजपणे वापरले जाऊ शकतात,” असे चावला म्हणाल्या.
सौंदर्य
- साली नसलेले काजू दिसयाला अधिक आकर्षक वाटतात. “साल नसलेल्या काजूचा आकार आणि चव एकसारखी असते.
- शेवटी काजू सालीसह किंवा सालाशिवाय निवडणे ही वैयक्तिक पसंती आहे.
- जास्तीत जास्त पौष्टिक फायदे आणि तीव्र चवीसाठी साल असलेले काजू निवडा.
- गुळगुळीत पोत आणि पदार्थांमध्ये समाविष्ट करण्यासाठी साल असलेले काजू हा एक चांगला पर्याय असू शकतो.