AC health risks: उन्हाळा सुरू होताच बहुतेक लोक त्यांचे एसी सुरू करतात. कडक ऊन सुरू झाले की, अनेकांच्या घरात दिवसभर आणि रात्रभर एसी सुरू असतात. मात्र, काही घरांमध्ये १२ महिने एसी सुरू असतो, तर अनेक जण रात्री एसी सुरू ठेवूनच झोपून जातात. तुर्कीतील अंतल्या येथे रात्रभर एसी लावून झोपणे एका महिलेला महागात पडले आहे. २४ वर्षीय लियाना फॉस्टर रात्रभर एसीमध्ये झोपली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा तिला अशक्तपणा आणि टॉन्सिलवर पांढरे डाग दिसले. रात्रभर एसी चालू ठेवून झोपल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या सी. के.बिर्ला हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉ. मनीषा अरोरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. मनीषा अरोरा यांच्या मते, एसीमध्ये झोपल्याने तुमच्या शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात. जेव्हा तुम्ही एसीमध्ये झोपता तेव्हा खोलीचे तापमान रात्री इतके कमी होते की, तुमच्या शरीराला अस्वस्थ वाटू शकते. अधिक काळ एसी लावून झोपल्यामुळे डोकेदुखी आणि पाठदुखीची समस्या जाणवते. एसीमुळे निर्माण होणारी थंड हवा त्वचेतील ओलावा काढून टाकू शकते, ज्यामुळे कोरडेपणा येतो. कमी आर्द्रता आणि प्रसारित हवेमुळे श्वासोच्छ्वासाच्या समस्यांचा धोका वाढतो. त्याशिवाय एअर कंडिशनरमुळे पर्यावरणाची हानी होते. ते भरपूर ऊर्जादेखील वापरते; ज्यामुळे हवामानावर अतिरिक्त भार पडतो. एअर कंडिशनरमधील हायड्रोफ्लुरोकार्बन या वायूमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते.

Kolkata Rape CAse Autospy Report
Kolkata Rape Case : पीडितेच्या शरीरावर १४ जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात आढळला चिकट द्रव्य; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Kolkata Crime News
Kolkata Doctor Rape and Murder : ‘पीडितेचा गळा दाबला, लैंगिक छळ आणि…’ शवविच्छेदन अहवालाबाबत पांचजन्यचा मोठा दावा
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
IMA Chief Write Letter
Kolkata Rape Case : “डॉक्टरांना जगू द्या…”, कोलकाता बलात्कार प्रकरणी IMA च्या अध्यक्षांचं भावनिक पत्र!
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
Kolkata Rape and Murder Case
Kolkata Doctor Rape and Murder : “रुग्णालयात तिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या शरीरावर फक्त..”, कोलकाता पीडितेच्या आईने सांगितलं वास्तव

श्वसनाच्या समस्या वाढू शकतात

डॉ. अरोरा म्हणाल्या, “एसीमुळे दमा, सीओपीडी व ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या समस्यादेखील वाढू शकतात. संधिवाताच्या रुग्णांमध्ये यामुळे स्नायू कडक होणे आणि सांधेदुखी यांसारखे त्रास बळावू शकतात. त्याव्यतिरिक्त एसी युनिट नियमितपणे साफ न केल्यास एसीमधली धूळ आणि बुरशीमुळे संवेदनशील व्यक्तींची अॅलर्जी वाढू शकते. सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत संक्रमण आणि अॅलर्जीचा धोका वाढू शकतो. रात्रभर एसीमध्ये झोपल्यानंतर सकाळी एखाद्याला जडपणा, डोकेदुखी, मळमळ व थकवा जाणवू शकतो.” पुढे डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले की, हे कधी कधी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्या वाढवू शकते; विशेषत: वृद्ध लोकांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये.

हेही वाचा >> गरीब लोकांच्या तुलनेत श्रीमंत लोकांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक का? डॉक्टरांनी सांगितली कारणं….

एसी असलेल्या खोलीत तुम्ही किती वेळ घालवावा?

एसी असलेल्या खोलीत घालवलेला वेळ मर्यादित करण्याची शिफारस केली जाते. तापमान खूप जास्त नसून मध्यम पातळीवर ठेवावे, असे डॉ. अरोरा म्हणाले. सोबतच आपण पर्यावरणावरील परिणामाचाही विचार केला पाहिजे. कारण- एसीचा वापर वाढल्याने विजेचा जास्त वापर होतो आणि त्यामुळे अधिक प्रमाणात हायड्रोफ्लुरोकार्बन वायू बाहेर पडतो आणि हवामान बदलात भर पडते. त्यामुळे त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी नियमित विश्रांती घेण्याचा आणि नैसर्गिक हवा व तापमानात राहण्याचा सल्ला दिला जातो. एसी असलेल्या खोलीत दोन ते तीन तास घालवणे पुरेसे आहे. रात्री तुम्ही दोन ते तीन तासांनंतर एसी स्वयंचलितपणे बंद होण्यासाठी सेट करू शकता. २२ ते २६ अंश सेल्सिअससारखे आरामदायक तापमान राखले पाहिजे. एसीमध्ये HEPA फिल्टर वापरल्याने धूळ आणि अॅलर्जी कमी होण्यास मदत होऊ शकते.