Women Lost 63 Kilo By Eating Protein: अँड्रिया पेन्स नावाच्या ३८ वर्षीय महिलेने दोन वर्षांत प्रथिनांच्या सेवनाने आणि पोर्शन कंट्रोलने १४० पौंड म्हणजे साधारण ६३. ५ किलोपेक्षा जास्त वजन कमी केल्याचा दावा केला आहे. तिला खरंतर फक्त ९० पौंड म्हणजे ४० किलो वजन कमी करायचे होते पण या प्रवासात तिने १४० पौंड पर्यंत वजन कमी करण्यात यश मिळवले. यानंतर तिची गमावलेली झोप तिला परत मिळाली. दररोज व्यायामामुळे तिची ऊर्जा वाढण्यास मदत झाली. या प्रवासात प्रथिनेयुक्त आहाराने खूप मोठा वाटा उचलला असल्याचे पेन्सने म्हटले आहे. जर तुमचा आहार अधिक प्रथिनेयुक्त असेल तर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते म्हणूनच वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. प्रथिनांमुळे वजन कमी होण्यास कशी मदत होऊ शकते हे पाहूया..

स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिने आवश्यक आहेत. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, तुमचे एकूणच चयापचय सुद्धा याने सुधारू शकते. सौरभ बोथरा, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमाणित योग प्रशिक्षक, Habuil यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “प्रथिनेयुक्त आहारासह, संतुलित पोषण, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि तणावाचे व्यवस्थापन केल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.”

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…

शारीरिक हालचालींना ऊर्जा देण्यासाठी आपल्या शरीराला पोषक तत्वांचा, विशेषतः कार्ब्स, प्रथिने आणि लोहाचा स्थिर पुरवठा आवश्यक असतो. क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, “कार्ब्स हे संथ गतीने जळणारे ऊर्जा स्रोत आहेत व स्नायूंच्या दुरुस्ती व वाढीसाठी प्रथिने आवश्यक आहेत, या दोन्हीच्या अनुपस्थितीमुळे शरीराची सहनशक्ती कमी होऊ शकते. लोहाच्या अपुऱ्या सेवनामुळे अशक्तपणा येऊ शकतो.” प्रथिनांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सतत वरच्यावर खाण्याची इच्छा कमी होते परिणामी जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. याउलट उच्च कार्ब्स व साखरयुक्त आहार शरीरात इन्सुलिन सोडतो ज्यामुळे लवकरच भूक लागू शकते.

डॉ राजीव मानेक, सल्लागार जनरल लॅप्रोस्कोपिक, मेटाबॉलिक आणि बॅरिएट्रिक सर्जरी, वोक्हार्ट हॉस्पिटल्स मीरा रोड सांगतात की, वजन कमी करण्यासाठी आवश्यक आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन खाणं टाळणे. तणाव किंवा नकारात्मक भावनांचा सामना करण्यासाठी मार्ग शोधणे. विनाकारण खाण्याचे प्रमाण कमी केल्यास वजन कमी होण्यासच नव्हे तर आदर्श वजन राखण्यात सुद्धा मदत होऊ शकते.

डॉ. मानेक पुढे म्हणाले की, वेगाने वजन कमी करण्याच्या पद्धती दीर्घकाळ परिणाम देत नाहीत. या पद्धतींमधील लहानसा बदल सुद्धा वजन वाढवू शकतो. त्याऐवजी आपण संथ पण सातत्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करायला हवा.

प्रथिनांचा ओव्हरडोस होतोय का हे कसे ओळखाल?

यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबादचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ दिलीप गुडे यांनी सांगितले की, “प्रत्येक जेवणात २० ते ३० ग्रॅम प्रथिने असायला हवीत. दररोजच्या एकूण ऊर्जेच्या ४० टक्के कॅलरीज प्रथिनातून मिळण्यासाठी हे आवश्यक आहे.”

मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार, नेफ्रोलॉजिस्ट व फिजिशियन डॉ पुनीत भुवानिया यांनी सांगितले की, प्रमाणाच्या पेक्षा जास्त किंवा नियंत्रण सोडून प्रथिनांचे जास्त प्रमाणात सेवन करणे हे किडनीच्या विकाराचे कारण ठरू शकते. प्रथिने पचायला कधी कधी जड होऊ शकतात, जास्त प्रथिनांचे सेवन केल्याने मूत्रपिंडावर ताण येऊ लागतो परिणामी किडनी स्टोन किंवा किडनी फेल्युअरचा धोका वाढतो. काही वेळा किडनी पूर्ण निकामी होऊ शकते ज्या स्थितीत डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाला पर्याय उरत नाही.

हे ही वाचा<< झोपेतून उठताच रिकाम्या पोटी ओव्याचा चहा घेण्याचे फायदे डॉक्टरांनीच सांगितले; फक्त प्रमाण ‘इतकं’ हवं

डॉ. भुवनिया सांगतात की, जास्त प्रथिने जास्त नुकसान करू शकतात. मांसाहाराच्या स्वरूपात मिळणारी प्रथिने ही संतृप्त चरबीसह मिश्रित असतात जे हृदयविकाराचे कारण ठरू शकते. त्यामुळे आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित असलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रथिनांच्या सेवनाचे प्रमाण ठरवू शकता.

Story img Loader