pregnancy Tips: गर्भधारणेच्या नऊ महिन्यांपर्यंत महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात गर्भधारणेचे महिने जसजसे पुढे जातात, तसतसे गर्भवती महिलांच्या समस्याही वाढतात. कालांतराने शारीरिक बदल आणि वाढलेल्या पोटामुळे महिलांना उठणे, बसणे आणि झोपणेदेखील त्रासदायक होऊ लागते. गर्भधारणेदरम्यान, महिलांच्या पोटावर खूप दबाव असतो, यामुळे महिलांना बराच वेळ झोपून राहणे आवडते. मात्र, हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. अलीकडेच अभिनेत्री आलिया भट्टच्या फिटनेस ट्रेनरने खुलासा केला आहे की, हार्ट ऑफ स्टोनचा पहिला हॉलीवूड चित्रपट चित्रित करताना गरोदर असतानाही अभिनेत्री आलिया भट्ट हिने ॲक्शन सीन शूट केले.
अभिनेत्रींचे अनुकरण करत व्यायाम करताय?
दरम्यान, आलियाच नाही तर अशा अनेक अभिनेत्री सोशल मीडिया स्टार आहेत, ज्या गर्भधारणेदरम्यान कठोर व्यायाम, योगा किंवा कामे करतात. यांनाच पाहून सर्वसामान्यही त्याचे अनुकरण करतात. मात्र, हे करताना काय काळजी घ्यावी, याचे परिणाम काय होतील याचा विचार करणं गरजेचं आहे. यासंदर्भात योगा प्रशिक्षक अंशुका परवानी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
योगा प्रशिक्षक अंशुका परवानी सांगतात की, “मला अजूनही आठवतं, आलिया तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट हार्ट ऑफ स्टोनसाठी शूटिंग करत होती. त्या भूमिकेसाठी आलियाला अनेक ॲक्शन सीक्वेन्स करावे लागले. अर्थातच त्यावेळी मला माहीत होते की ती गर्भवती आहे. सुरुवातीला ती शूटिंग करत असताना आम्ही व्यायाम करत होतो. त्यानंतर दुर्दैवाने मी तिच्यासोबत प्रवास केला नव्हता, कारण तो करोनाचा काळ होता, त्यामुळे मी कोणाच्याही शरीराबद्दल आणि योगाबद्दल जागरूक असल्याशिवाय त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. पुढे आलिया भट्टच्या गर्भधारणेदरम्यान तिचे कौतुक करताना अंशुका परवानी पुढे सांगतात की, “आलिया गर्भवती होती आणि तिला ॲक्शन सीक्वेन्स करावे लागले ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत तिला ऑनलाइन प्रशिक्षण देणे कोणालाही सोयीचे होणार नाही. पण, आलियामध्ये तशी जागरूकता असल्यामुळे, त्या निर्धारित कालावधीत आम्ही रिमोट ट्रेनिंग केली. विशेष म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किंवा ॲक्शन सीन करत असताना ती गरोदर होती असं कुणीही बोलणार नाही. मात्र, हे प्रत्येकालाच लागू होईल असं नाही. प्रत्येकाच्या शारीरिक अवस्थेवर गर्भधारणेदरम्यान काय करावे आणि काय करू नये हे अवलंबून असते.
हेही वाचा >> Walking workout: तुम्हालाही घरात राहून कॅलरीज बर्न करायच्या आहेत का? डॉक्टरांनी सांगितला अवघ्या १२० सेकंदाचा व्यायाम
गर्भधारणेदरम्यान प्रत्येक निर्णयात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
दरम्यान, पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटल्सचे सल्लागार- प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कैशरीन खान यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टर कैशरीन खान यांच्या मते गर्भधारणेदरम्यान अनेक महिलांना जास्त मेहनतीची कामे, जास्त हालचाल करण्याची शिफारस केली जात नाही; कारण त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो.” “तुम्हाला हे ऐकूनदेखील धक्का बसेल की, कठोर व्यायामामुळे गर्भ आणि आईच्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाह कमी होऊ शकतो, ज्यामुळे बाळासाठी समस्या उद्भवू शकतात, यामुळे बाळाच्या वाढीशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात. तसेच कठोर व्यायाम केल्याने मातांना दुखापत होण्याची शक्यतादेखील वाढू शकते”, त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही ट्रेंडचे अनुसरण करू नये किंवा फक्त तुमची आवडती सेलिब्रिटी ते करत आहे म्हणून काहीही करण्याचा प्रयत्न करू नये,असा सल्ला डॉक्टर कैशरीन यांनी दिला आहे. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.