बदलत्या जीवनशैलीचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहे. डेस्क जॉब्स आणि डिजिटल स्क्रीनचे वर्चस्व असलेल्या युगात अनेक लोक त्यांचा दिवसातील महत्त्वपूर्ण वेळ कॉम्पुटरसमोर बसून घालवतात. या बैठ्या जीवनशैलीचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होतो. आपण दररोज आठ तास सतत स्क्रीनकडे टक लावून पाहत राहत असू; तर त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे अनेक वाईट परिणाम होतात. आपल्या स्क्रीनकेंद्रित जीवनात कोणाच्याही लक्षात न येणार्‍या विविध आरोग्यविषयक परिणामांबाबतची माहिती आपण आजच्या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

खूप वेळ स्क्रीनकडे टक लावून पाहिल्यास त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि त्यामुळे उदभवणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नेमके काय उपाय करायला पाहिजेत याच्याशी संबंधित सविस्तर माहिती डॉ. सपना कोतवालीवाले (नेत्ररोग तज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक) यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितली आहे. यावेळी त्यांनी आपले डोळे कोरडे का पडतात आणि ते पडू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी हेदेखील सांगितले आहे.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Yes Madam Fires Over 100 Employees for Feeling Stressed at Work Viral Email Claims
“ही तर चिटींग आहे!” आधी ऑफिसमध्ये कामाचा ताण येतो का विचारले अन् ज्यांनी होकार दिला त्यांनाच कामावरून काढून टाकले
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

हेही वाचा- इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे काय? या आजारात कॉफी कशी ठरतेय फायदेशीर, वाचा

कोरडे डोळे

जेव्हा आपण सतत स्क्रीनकडे टक लावून पाहत असतो, तेव्हा आपण खूप कमी वेळा डोळ्यांची उघडझाप करतो. डॉ. कोतवालीवाले यांच्या म्हणण्यानुसार, सामान्यपणे दर मिनिटाला १० ते २० वेळा आपण डोळ्यांची उघडझाप करतो. परंतु, स्क्रीनकडे पाहताना ती मिनिटातून केवळ तीन ते आठ वेळा होते.

“सामान्यपणे डोळ्यांची उघडझाप होते तेव्हा आपल्या अश्रुग्रंथींमधून पाणी येते, डोळे मिचवकल्याने बाहेर पडणारे अश्रू डोळ्याच्या कॉर्निया नावाच्या पारदर्शक भागाला पोषण देतात. डोळ्यांची उघडझाप कमी केल्याने डोळ्यांतून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रमाण कमी होते; ज्यामुळे ते कोरडे पडतात.” त्या पुढे सांगतात की, कोरड्या डोळ्यांमुळे डोळ्यांमध्ये अस्वस्थता, पाणी येणे व लालसरपणा येऊ शकतो. कोरड्या डोळ्यांमुळे कॉर्नियावर ओरखडे येऊ शकतात आणि दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

डोळे कोरडे पडू नयेत यासाठी काय करावे?

स्क्रीनसमोर काम करताना दर ३० मिनिटांनी, पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन खुर्चीवरून उठून थोडे फिरा.
नियमितपणे डोळ्यांची उघडझाप करीत रहा.
ओमेगा-३-फॅटी अॅसिडपूरक आहार (तूप, काजू, अंबाडीच्या बिया इ.) घ्या.
तुमच्या नेत्रतज्ज्ञांनी लिहून दिलेला आय ड्रॉप वापरा.

डोकेदुखी

बराच वेळ डोळ्यांना आराम न देणे आणि बराच वेळ स्क्रीनसमोर काम करीत राहिल्यामुळे डोकेदुखी आणि डोळे दुखणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

डोकेदुखी टाळण्यासाठी

योग्य तो चष्मा घाला आणि नियमित आपल्या डोळ्यांची तपासणी करा.

२०-२०-२० नियम पाळा. दर २० मिनिटांनी २० फूट अंतरावरील वस्तू २० सेकंदांसाठी पाहा.

चष्मा न वापरल्यामुळे डोळ्यांभोवती सूज आणि इतर विविध समस्या उदभवू शकतात.

हेही वाचा- Meftal : वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘मेफ्टल’चे सेवन करीत असाल, तर सावधान! औषधाबाबत सरकारने दिला गंभीर इशारा

अंगदुखी

शरीराची अयोग्य स्थिती व अपुरी विश्रांती यांमुळे मान आणि पाठीचे स्नायू दुखावणे यांसारखी समस्या उदभवू शकते.

अंगदुखी टाळण्यासाठी उपाय

तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मॉनिटर योग्य ठिकाणी ठेवा; जेणेकरून तुम्हाला योग्य स्थितीमध्ये बसून काम करता येईल. किंवा स्टॅण्डिंग डेस्क बनवा.

झोपेच्या समस्या

स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या निळ्या प्रकाशाच्या उत्सर्जनामुळे झोपेसंबंधीच्या अनेक समस्या उदभवू शकतात. त्यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रियादेखील बिघडू शकते; ज्यामुळे वजन वाढण्यासह इतर अनेक आजार होऊ शकतात.

स्क्रीनचा दीर्घकाळ वापर केल्याने डोळ्याच्या रेटिनामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

झोपेची समस्या टाळण्यासाठी उपाय

झोपेच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्क्रीन बंद करा.

खोलीतील प्रकाश आणि स्क्रीनचा प्रकाश कमीत कमी ठेवा. अँटी रिफ्लेक्टिव्ह स्क्रीन कव्हर आणि चष्मा यांचा वापर करा.

Story img Loader