world blood donor day 2024 : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, कारण हे सुरक्षित रक्त एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते. गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मादरम्यान गुंतागूंत असलेल्या स्त्रियांना, गंभीर ॲनिमिया असलेल्या मुलांना, अनेकदा मलेरिया किंवा कुपोषणामुळे, अपघातातील जखमी, शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती आणि कर्करोगाच्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. अशावेळी एखाद्या व्यक्तीने दान केलेले रक्त त्यांचा जीव वाचवू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रक्त वापरण्यापूर्वी मर्यादित कालावधीसाठीच साठवले जाऊ शकते, त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या नियमित पुरवठ्याची सतत गरज असते, म्हणूनच पुरेशा संख्येने निरोगी लोकांनी नियमित रक्तदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्त जेव्हा गरज असेल तेव्हा आणि कुठेही उपलब्ध होईल. त्यामुळे जास्तीत जास्त निरोगी लोकांनी रक्तदान करावे, यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १४ जूनला जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो.
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त, आरोग्य मंत्रालयाने देशातील रक्त संक्रमणाच्या उच्च मागणीकडे लक्ष वेधले आहे. भारतात सध्या दर दोन सेकंदांनी एकाला रक्ताची आवश्यकता भासते. देशाला वार्षिक सरासरी १४.०६ दशलक्ष रक्त युनिट्सची आवश्यकता आहे आणि भारताला सातत्याने १ दशलक्ष युनिट्सच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी, मंत्रालयाने रक्तदान उपक्रमांची मालिका “रक्तदान अमृत महोत्सव” मोहीम सुरू केली आहे.
“वैद्यकशास्त्राने तांत्रिक प्रगती केली असली तरी रक्ताला पर्याय नाही. एका निरोगी व्यक्तीने दान केलेल्या रक्तामध्ये तीन जीव वाचवण्याची क्षमता असते. संभाव्य दात्यांना रक्तदानापासून परावृत्त करणारे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे.” हे गैरसमज दूर करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने डॉ. मकरंद गणपुले यांच्याशी संवाद साधला.
रक्तात नेमकं काय काय असतं?
रक्तदान करण्यापूर्वी रक्तामध्ये नेमकं काय असतं आणि आपल्या शरीरामध्ये त्याचं काय कार्य आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. “ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहचवणे आणि पेशींमध्ये जो कार्बनडाय ऑक्साईड तयार होतो तो फुफ्फुसांपर्यंत पोहचवणे हे रक्ताचे मुख्य कार्य आहे. पोषक तत्वे, प्रथिने, कर्बोदके जी आपण आहारातून घेतो ती पेशींपर्यंत पोहोचवणे हे काम रक्ताचे असते. रक्तामध्ये लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा असतात. लाल रक्तपेशींचे काम असते ऑक्सिजनची ने-आण करणे. पांढऱ्या रक्तपेशींचे काम असते संसर्ग आणि इतर रोगांशी लढण्यास मदत करणे. एखादी जखम झाली जर गुठळी तयार करून रक्त थांबवणे हे काम प्लेटलेट्सचे असते. प्लाझ्मा म्हणजे रक्तातील पाणी. प्लाझ्मामध्ये विविध प्रकारची पोषकतत्वे असतात, ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचवणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. तसेच नको असलेले घटक शरीराबाहेर टाकायचे असतात, ते मूत्रपिंडपर्यंत पोहचवणे हेदेखील प्लाझ्माचे मुख्य काम असते.”
हेही वाचा – खूप हसल्यामुळे हैदराबादमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध; पण हे कसे शक्य? तज्ज्ञांनी केला खुलासा
रक्तदानाचे आरोग्यविषयक फायदे कोणते?
एखादी व्यक्ती रक्तदान करते तेव्हा रक्तातील लाल रक्त पेशी वेगळ्या केल्या जातात, त्याला म्हणतात पॅक्ड सेल. त्यानंतर रक्तातील प्लेटलेट्स वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर रक्तातील पाणी असते ज्याला ‘प्लाझ्मा’ असे म्हणतात, ते देखील वेगळे केले जाते. या तीन गोष्टींमुळे तीन जणांचा जीव वाचू शकतो. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे किंवा अपघातामुळे रक्तस्त्राव खूप झाला असेल तर अशा व्यक्तीला पॅक्ड सेल म्हणजे लाल रक्त पेशी दान केल्या जातात.
पावसाळ्यामध्ये डेंग्यूसारखे आजार पसरतात, तेव्हा रक्तातील प्लेटलेट खूप कमी होतात. अशा रुग्णांना प्लेटलेट दान करता येतात. एखाद्या रुग्णाला शॉक लागलेला असतो किंवा काही जणांच्या रक्तातील anti-collagenची संख्या खूप कमी असते, तेव्हा प्लाझ्मा दान केला जातो; ज्यामुळे रक्तस्त्राव थांबवता येऊ शकतो. अशाप्रकारे रक्तदान केल्याने तीन रुग्णांचा जीव वाचतो. आपल्या शरीरामध्ये एकूण पाच लिटर रक्त असते, त्यापैकी रक्तदान करतो तेव्हा फक्त ३५० मिली रक्त काढले जाते. आपले शरीर पुढील दोन-तीन महिन्यात पुन्हा रक्त तयार करते.
रक्तदान सुरक्षित आहे का?
“रक्तदान करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. वय वर्ष अठरा ते साठपर्यंत शरीराने तंदुरुस्त व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
एखादी व्यक्ती किती वेळा आणि किती काळाने रक्तदान करू शकते?
रक्तदान केल्यानंतर साधारण ३ महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करू शकता. तीन महिन्यांमध्ये शरीरामध्ये रक्तातील लाल पेशी पुन्हा तयार होतात.
रक्तदान कोण करू शकत नाही?
- रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा रक्तदाब कमी किंवा जास्त असेल तर अशी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- एखाद्या व्यक्तीला तीव्र अनियंत्रित मधुमेह असेल तर अशी व्यक्तीदेखील रक्तदान करू शकत नाही.
- व्यक्तीचे हिमोग्लोबिन कमी किंवा जास्त आहे, अशी व्यक्तीदेखील रक्तदान करू शकत नाही. रक्तदान करण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी १२.५.5g/dL पेक्षा जास्त असली पाहिजे.
- हिपॅटायटीस बी (एचबीव्ही), हिपॅटायटीस सी (एचसीव्ही) आणि ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) यांसारखे रक्तातून संक्रमित होणारे आजार असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- सहा महिने किंवा एका वर्षात एखाद्याला मलेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आलेला असेल, पाण्यातून होणारे आजार जसे की, हिपॅटायटीस बी किंवा हिपॅटायटीस ए झाले असतील तर अशी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- रक्तदान करण्यापूर्वी एक दिवस आधी किंवा रक्तदानाच्यावेळी मद्यपान केले असेल, तर अशी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- खूप जास्त धूम्रपान (Chain Smokers) करणारी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- मासिक पाळी सुरू असतानाही महिला रक्तदान करू शकतात, पण खूप रक्तस्त्राव होत असेल तर अशावेळी रक्तदान टाळलेले योग्य ठरते.
- गर्भवती स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत, कारण या काळात आई आणि बाळाला त्या रक्ताची आवश्यकता असते.
- कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असेल तर अशी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
- सामान्य दाताचे उपचार घेत असलेली व्यक्ती रक्तदान करू शकते, गंभीर उपचार सुरू असतील तर त्यांनी रक्तदान टाळावे.
युनिव्हर्सल ब्लड डोनर म्हणजे काय?
प्रत्येक व्यक्तीचे रक्तगट असतात. रक्ताचे दोन प्रकार असतात, ABO प्रणाली आणि Rh प्रणाली. betterhealthने दिलेल्या माहितीनुसार, “ABO प्रणालीतील चार भिन्न रक्तगट A, B, AB आणि O आहेत. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट जनुकांच्या (genes) जोडीने निर्धारित केला जातो. प्रत्येक पालकाकडून बाळाला एक जनुक मिळतो, तर एखाद्या व्यक्तीच्या रक्तगटाला त्यांचा ‘ ‘Rhesus type” असे म्हटले जायचे; पण आता आपण ‘आरएच प्रकार’ म्हणतो. Rh प्रकार तुमचा ABO रक्त प्रकार निर्धारित करणाऱ्या जनुकांच्या (जिन्स) वेगळ्या जोडीद्वारे निर्धारित केला जातो. जो प्रत्येक पालकाकडून वारसा म्हणून मिळतो.”
A रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त A पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीलाच दिले जाते. B रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त A पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला दिले जात नाही किंवा AB पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीचे रक्त ए पॉझिटिव्ह किंवा बी पॉझिटिव्हला दिले जात नाही.
ABO प्रणालीमध्ये लाल रक्तपेशी असतात, पेशीपटलावर काही प्रकारची प्रोटीन असतात, त्यांना अॅन्टीजेन म्हणतात. ओ निगेटिव्ह रक्तगटामध्ये ABO प्रणालीमध्ये पेशीपटलावर अॅन्टीजेन नसतात आणि Rh प्रणालीमध्येही पेशीपटलावर हे अॅन्टीजेन नसतात. त्यामुळे ओ निगेटिव्हला युनिव्हर्सल रक्तगट म्हणतात. काही वेळा रुग्णाला रक्त चढवल्यानंतर त्रास होतो; असा त्रास ओ निगेटिव्ह रक्तामुळे होत नाही.”
रक्तदान करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
- रक्तदान करायला जाताना कधीही उपाशीपोटी जाऊ नये, काहीतरी खाल्लेले असले पाहिजे.
- रक्तदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने धूम्रपान किंवा मद्यपान करू नये.
- रक्तदान करायला जाताना सैल कपडे घाला. टाईट कपडे घालू नये, जेणेकरून अस्वस्थता जाणवणार नाही.
रक्तदान केल्यानंतर काय काळजी घ्यावी?
- रक्तदान केल्यानंतर काही वेळ तेथेच थांबावे, कारण रक्तदान केल्यानंतर थकवा जाणवतो किंवा चक्कर येते.
- रक्तदान केल्यानंतर थकवा येऊ शकतो, पण दिवसभर आराम केल्यास तुम्हाला बरे वाटेल. सहसा रक्तदानाच्या दिवशी सुट्टी घ्यावी.
- रक्तदान केल्यावर मैदानी खेळ टाळावे.
दान केलेल्या रक्तामुळे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे का?
दान केलेल्या रक्तामुळे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असू शकते. प्रत्येक रक्तपेढीला जे रक्त जमा झालेले आहे त्यामध्ये मलेरिया, हिपॅटायटिस बी (एचबीव्ही), हिपॅटायटिस सी (एचसीव्ही) आणि ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) या आजारांची तपासणी करणे आवश्यक असते. पण, आजारांसाठी एक Window period असतो, म्हणजे या काळात रक्ताची तपासणी केल्यास या आजारांचे निदान होत नाही. समजा एखाद्या अशा रक्तदात्याचे रक्त आलेले असेल आणि ज्याचे निदान होऊ शकत नाही, तर ते रक्त कोणाला दिले गेले तर त्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असू शकते. पण, तपासणीच्या पद्धतींमध्ये खूप सुधारणा झाली आहे. न्यूक्लिक ॲसिड चाचणी (Nucleic acid test) आणि मोनोसाइट ॲक्टिव्हेशन टेस्ट (MAT) सारख्या तपासणी ज्या रक्तपेढ्या करतात, या तपासणीमध्ये संसर्गजन्य रोगाच्या Window period मध्येही रोगाचे निदान करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे संक्रमित झालेले रक्त रुग्णांना दिले जात नाही. म्हणून न्यूक्लिक ॲसिड चाचणी (Nucleic acid test) आणि मोनोसाइट ॲक्टिव्हेशन टेस्ट (MAT) करणाऱ्या रक्तपेढ्यांमधून रक्त घ्यावे. अशा रक्तपेढ्यांमधून घेतलेल्या रक्तातून रक्त संक्रमित होण्याची शक्यता फार कमी असते. मॅट टेस्टिंग खूप महाग असल्यामुळे सर्व रक्तपेढ्या हे करतातच असे नाही.
रक्त ही सर्वात मौल्यवान भेट आहे, जी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकता. रक्तदान करण्याचा निर्णय एखाद्याचे जीवन वाचवू शकतो.