बॉलीवुडचा अभिनेता संजय दत्त हा कॅन्सर सारख्या गंभीर आजारातून बाहेर पडला, त्याने स्वतः ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. २०२० साली जेव्हा अभिनेता संजय दत्त त्याच्या ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर शेवंती लिमये यांच्याकडे गेला तेव्हा त्याला स्टेज ४ फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्याने यावेळी घाबरून न जाता या आजाराशी लढण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो पूर्णपणे या आजारातून बरा झाला तेव्हा त्याने सांगितले की, कॅन्सरशी लढा चालू असताना तो कोणतंही टेन्शन किंवा काळजी न करता पूर्णपणे शांत होता. त्याने डॉ लिमये यांना असंही सांगितले की, ‘मला कॅन्सर झाला नसल्याप्रमाणे मी पुढे जाणार आहे, मी फक्त माझे जीवन परत मिळवण्यावर लक्ष केंद्रित करेन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे पालन करेन’. त्याने कॅन्सरशी लढा देताना नकारात्मकता कधीच जवळ येऊ दिली नाही. त्याच्या इच्छाशक्तीमुळे त्याने कॅन्सरचा सामना केला. कॅन्सरशी लढा देणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं, याआधीही त्याने त्याची आई आणि पहिली पत्नीला कॅन्सरमुळे गमावलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा