Homeopathy vs Ayurveda : आज (१० एप्रिल) जगभरात जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो. डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. डॉ. सॅम्युअल हे होमिओपॅथीक औषधांचे जनक होते, त्यांनी विविध होमिओपॅथीक औषधांचा शोध घेतला. पण आज अॅलोपॅथीक, होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार या सर्व पद्धतीने रुग्णांवर उपचार केले जातात. यातील होमिओपॅथी आणि आयुर्वेद या दोन्ही भारतातील उपचार पद्धती आहेत. होमिओपॅथीक औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. पण आज आम्ही तुम्हाला होमिओपॅथी आणि आयुर्वेदमध्ये नेमका काय फरक आहे ते सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होमिओपॅथी उपचार पद्धती म्हणजे काय?

WebMD नुसार, होमिओपॅथी ही अशी एक औषधोपचार पद्धती आहे, जी शरीर स्वत:ला बरे करु शकते या विश्वासावर आधारित आहे. १७०० च्या उत्तरार्धात जर्मनीमध्ये ही औषधोपचार पद्धत विकसित झाली. युरोपियन देशांमध्ये ही उपचार पद्धती सामन्य आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांना ‘होमिओपॅथ’ असे म्हणतात. ही उपचार पद्धत “लाइक क्युअर लाइक” नावाच्या वेगळ्या कल्पनेवर आधारित आहे. ज्याचा मराठी अर्थ तोच रोग, तोच उपचार असा आहे. होमिओपॅथिक उपचारांमध्ये कोणताही रोग केवळ बरा होत नाही तर तो मुळापासून दूर करण्याचा दावा केला जातो. या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम खूप कमी असतात, ज्यामुळे सर्व वयोगटातील लोकांवर याद्वारे उपचार केले जाऊ शकतात.

पण होमिओपॅथी औषधांच्या सेवनादरम्यान धूम्रपानसह अनेक गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. पुरळ, दातदुखी, डोकेदुखी, मळमळ, खोकला, सर्दी यासारख्या अनेक समस्यांवर होमिओपॅथीचा वापर केला जातो. याशिवाय अस्थमा, वंधत्व, हृदयविकार यांसारख्या आजारांवरही ही उपचार पद्धती फायदेशीर मानली जाते. या उपचार पद्धतीमधील औषधांचा प्रभाव मंद गतीने होत असतो, ज्यामुळे कोणताही रोग मुळापासून नष्ट करता येतो.

आयुर्वेदिक उपचार पद्धती म्हणजे काय?

आयुर्वेदिक औषध (आयुर्वेद) ही जगातील सर्वात जुनी सर्वांगीण उपचार पद्धतींपैकी एक आहे. भारतात ३००० वर्षांपूर्वी विकसित झालेली ही उपचार पद्धती आहे. मन, शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलनावर आपले आरोग्य अवलंबून असते या विश्वासावर ही आधारित आहे. या उपचार पद्धतीचे मुख्य उद्दिष्ट रोगाशी लढणे असे नसून आरोग्य निरोगी ठेवणे असे आहे. परंतु विशिष्ट आरोग्य समस्यांवर आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर केला जातो. आयुर्वेद ही भारतातील सर्वात प्राचीन परंपरा उपचार पद्धती आहे. आयुर्वेदाला आतापर्यंत ३० हून अधिक देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. सर्दी, खोकला, सर्दी, पोटाचे आजार, किडनी इत्यादी आजारांवर आयुर्वेदिक औषधांचा आता उपयोग केला जातो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World homeopathy day 2023 whats difference between ayurveda and homoeopathy and how does it work read more sjr