किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. शरीरात निर्माण होणारे विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम किडनीमार्फत होते. शरीरातील अनेक कार्य किडनीवर अवलंबून असतात. पण जेव्हा किडनीचे कार्य बिघडते तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ शरीरातचं साठून राहतात. याचा परिमाण आपल्या यकृत, फुफ्फुस आणि इतर अवयवांवर दिसून योतो. यात जर किडनी निकामी झाली तर इतर अनेक गंभीर आजार शरीरात घरू करु राहतात. यामुळे लोकांमध्ये किडनी अवयवाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ९ मार्च हा जागतिक किडनी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आपण रोजच्या अशा ७ सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या किडनीवर नकळत गंभीर परिणाम होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. यात आपण आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींपासून दूर राहतो परंतु त्याचा फटका काही वर्षांनी आपल्याला सहन करावा लागतो. त्यामुळे रोजच्या जीवनातील अशा 7 सामान्य सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या किडनीला हानी पोहचत आहे.

द्रव पदार्थचं सेवन करा

कोणताही आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि आजार होण्याचा धोका कमी होतो. भरपूर द्रवपदार्थांचे सेवन हे निरोगी शरीर राखण्याचा उत्तम उपाय आहे. यामुळे मूत्रपिंडातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत होते. पुरेसे पाणी, डिटॉक्स ड्रिंक्स इत्यादींचे सेवन केल्याने अनेक शारीरिक गुंतागुंत कमी होते आणि किडनीचे कार्य सुरळीत राहते.

मीठाचे अधिक सेवन

आहारात सोडियम अर्थात मीठाचे प्रमाण वाढल्याने शरीरात गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषत: जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर जास्त मीठ सेवन केल्याने किडनीला हानी पोहोचते. यामुळे दररोज ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करा आणि शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रणात ठेवा.

बाहेरील रेडी टू मेक फूड

कामाच्या बिझी शेड्यूलमुळे अनेकजण रेडी टू मेक, पॅक फूड किंवा प्रोसेस्ड फूडला पसंती देतात. परंतु या पदार्थांचे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. अनेकदा अशा पदार्थांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते यामुळे किडनीला आणखी हानी पोहचते.

कमी शारीरिक हालचाल

तुम्ही दिवसातील अनेक तास बसून काम करत असाल तर यामुळे किडनीवर गंभीर परिणाम होतो. बऱ्याचदा वेळेत काम पूर्ण करण्याचा नादात आपण एकाच खुर्चीवर कोणतीही शारीरिक हालचाल न करता तासंतास बसून राहतोय, यामुळे पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतो. शारीरिक हालचालीमुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी आणि वजन नियंत्रणात राहते यामुळे किडनीवर कोणताही भार पडत नाही.

अतिरिक्त मद्यपानाची सवय

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटचं असतो. यामुळे अतिरिक्त मद्यपानाची सवय ही देखील शरीरासाठी वाईटचं आहे. अतिरिक्त मद्यपानामुळे किडनीवर गंभीर परिणाम होतात. तसेच मूत्रपिंडाचे कार्य बिघडते परिणामी रक्त गाळण्याची प्रक्रिया देखील प्रभावित होते.

अधिक साखरेचे सेवन

तुम्ही खूप जास्त गोड खायला आवडत असेल तरी ते शरीरासाठी घातक आहे. जास्त प्रमाणातील साखरेमुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो ज्याचा थेट घातक परिणाम किडनीवर घातक परिणाम होतो.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे

जर तुम्ही डोकेदुखी किंवा पाठदुखीसाठी खूप औषधी गोळ्या घेत असाल तर कृपया थांबा. कारण कोणत्याही औषधी गोळ्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण याच औषधी गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World kindey day 2023 this 7 common lifestyle and habits damaging your kidney sjr
Show comments