World obesity day 2023: दरवर्षी ४ मार्च हा लठ्ठपणा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नागरिकांमधील वाढत्या लठ्ठपणाबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. अशातच जागतिक लठ्ठपणा दिवसानिमित्त प्रकाशित केलेल्या वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनचा एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार २०३५ पर्यंत जगभरातील अर्ध्यांहून अधिक लोकसंख्या लठ्ठपणाची शिकार होऊ शकते अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. इतकेच नाही तर या अहवालात आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
२०३५ पर्यंत जगभरात लठ्ठपणाची समस्या वाढणार –
हेही वाचा- पुरुष नपुंसक होण्याचं प्रमाण का वाढतंय? लठ्ठपणा तर कारणीभूत नाही…
वर्ल्ड ओबेसिटी एटलस रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, २०२५ पर्यंत जगातील एक लोकसंख्येचा मोठा भाग लठ्ठपणाची शिकार होऊ शकतो. जवळपास ५१ टक्के लोकांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत जास्त होऊ शकते. त्यासोबतच लहान मुलांमध्येही ही समस्या वाढू शकते. वाढत्या लठ्ठपणामुळे डायबिटीज आणि हृदयासंबंधिचे आजार वाढू शकतात.
तरुण पडू शकतात आजारी –
हेही वाचा- दातांच्या समस्येने त्रस्त आहात? मग जाणून घ्या दातदुखीची कारणे आणि घरगुती उपाय
या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, २०२५ पर्यंत तरुण पिढीवर लठ्ठपणाचा मोठा परिणाम दिसून येईल, जो २०३५ पर्यंत गंभीर होऊ शकतो. अशा परिस्थितीत जगभरातील सरकारे आणि धोरणकर्त्यांनी तरुण पिढीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे अहवालात सांगितलं आहे. लठ्ठपणा हा एक वैद्यकीय शब्द आहे ज्याचा वापर शरीरात जास्त चरबी असलेल्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी केला जातो. बॉडी मास इंडेक्सच्या मदतीने त्याचे मूल्यांकन केले जाते. त्यामुळे तुमचा बीएमआय इंडेक्स तपासत राहा, व्यायाम आणि आहाराच्या मदतीने तुम्ही लठ्ठपणा टाळू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)