४ मार्च हा दिवस जगभरात लठ्ठपणा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आज सकाळपासून टीव्ही आणि सोशल मीडियावर या दिवसानिमित्त लठ्ठपणाच्या समस्येपासून सुटका कशी करुन घ्यायची याबाबतची माहिती दिली जात आहे. नुकताच वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनचा एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार २०३५ पर्यंत जगभरातील अर्ध्यांहून अधिक लोकसंख्या लठ्ठपणाची शिकार होऊ शकते अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. तर लठ्ठपणामुळे आपणाला अनेक आजार उद्भवतात ज्यामध्ये मधुमेह, हृदयविकाराचा समावेश आहेच, शिवाय लठ्ठपणामुळे त्वचेच्याही समस्याही उद्भवू शकते. तर लठ्ठपणा आणि त्वचा यांच्यातील संबंधाविषयी डॉ. जयश्री शरद कॉस्मेटिक त्वचाशास्त्रज्ञ यांनी हेल्थशॉट्सशी बोलताना काही माहिती दिली आहे, ती जाणून घेऊया.
लठ्ठपणा म्हणजे काय?
जेव्हा शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त होते त्याला लठ्ठपणा म्हणतात. डॉ शरद सांगतात की जेव्हा बॉडी मास इंडेक्स ३० च्या पुढे जातो तेव्हा तुम्हाला लठ्ठपणा झाला आहे असं म्हणता येत.
हेही वाचा- २०३५ पर्यंत जगभरातील ५० टक्याहून अधिक लोकांना ‘हा’ आजार होणार? तुम्हाला किती धोका कसे राहाल सावध…
लठ्ठपणा आणि त्वचा –
तज्ञांच्या मते, लठ्ठपणा एपिडर्मल बॅरियर त्वचेला बदलतो आणि ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस वाढवतो, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते. लठ्ठपणा त्वचेच्या अनेक समस्यांशी संबंधित आहे. त्या समस्या पुढीलप्रमाणे –
- स्ट्रेच मार्क्स जे इंडेंट केलेले आहेत आणि त्वचेवर लाल रेषा.
- सेल्युलाईट, जो त्वचेखाली चरबीचा साठा.
- अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींचा नसा, ज्या मोठ्या प्रमाणात पाय आणि पायांमध्ये दिसतात. शिवाय लठ्ठपणामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही वाढतो.
त्वचा काळी पडण्याची शक्यता –
हेही वाचा- पुरुष नपुंसक होण्याचं प्रमाण का वाढतंय? लठ्ठपणा तर कारणीभूत नाही…
जेव्हा लठ्ठपणाचा प्रवाभ त्वचेवर पडतो, तेव्हा मान आणि मांडीचा भाग काळसर होतो. आतील मांड्यांची समस्यादेखील लठ्ठपणाशी जोडलेली आहे. तज्ञांच्या मते लठ्ठ लोकांमध्ये, आतील मांड्यांमधील सतत घर्षणामुळे आतील मांड्या गडद काळ्या होतात.
लठ्ठपणा आणि पुरळ –
लठ्ठपणामुळे महिलांना पुरळ देखील येऊ शकते. डॉ शरद स्पष्ट करतात की त्वचेच्या पृष्ठभागामध्ये सतत घर्षण आणि ओलावा टिकून राहणे तसेच उबदारपणामुळे, लठ्ठ लोकांच्या शरीरात बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होण्याची शक्यता वाढते.
लठ्ठ महिलांनी त्वचेची काळजी घेण्यासाठीच्या टीप्स –
- लठ्ठ असो वा नसो, तुमची त्वचा नेहमी स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छता खूप महत्त्वाची आहे.
- तुमची त्वचा पूर्णपणे कोरडी करा आणि त्वचेचा कोणताही संसर्ग टाळण्यासाठी अँटी-फंगल डस्टिंग पावडरीचा वापर करा.
- आंघोळीनंतर स्वच्छ आणि कोरडे कपडे घाला. ओलसर कपडे म्हणजे पुन्हा संसर्गाला आमंत्रण देण्यासारखं आहे.
- चेहर्यासाठी, तुम्ही नियमित साफसफाई, मॉइश्चरायझिंग आणि सूर्यापासून संरक्षण करणारी दिनचर्या फॉलो करु शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)