Mental Stress Pranayam : देशभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र उत्साह आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतोच; त्याशिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. तणाव किती हानिकारक आहे याबद्दल आपण बरेच काही ऐकले आहे. तणाव हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढत जातो. या तणावामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. तणाव येत असेल, तर तुम्ही घरीच काही गोष्टी करू शकता. अवघ्या पाच मिनिटांच्या योगाने तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा या योगाने नैराश्य आणि चिंता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होते. योगातज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी आज योगातज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी सूर्यनमस्कार, नंतर योग निद्रा व त्यानंतर प्राणायाम करण्याची शिफारस केली आहे.

सकाळी उठल्यानंतर व्यायाम आणि योगासने केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते. पण कोणताही योगा करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. जसे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार करण्याची उत्तम वेळ म्हणजे सूर्योदयाची वेळ म्हणजे पहाटे ४:४५ ते ६ दरम्यान सूर्यनमस्कार करावेत.

विविध आसनांनुसार त्यांचे फायदे खालीलप्रमाणे :

सूर्यनमस्कार : त्वचा व केसांसाठी उपयुक्त

त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी उपयुक्त. सूर्यनमस्कारामुळे शरीर डिटॉक्सिफाय होऊन सौंदर्य वाढण्यास मदत होते. हे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवते आणि मुलांच्या विकासाला चालना देते. या क्रियेमुळे केसांना चांगले पोषण मिळते आणि त्यामुळे केस गळणे आणि पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. त्याचप्रमाणे ते चेहऱ्यातील रक्ताभिसरण वाढवतात, तसेच त्वचा निरोगी, तरुण व चमकदार ठेवण्यास मदत करतात.

शवासन : तणावमुक्ती व पेशीदुरुस्तीसाठी फायदेशीर

१. शवासन केवळ शरीराला आराम देत नाही, तर ते ध्यानाच्या अवस्थेतदेखील घेऊन जाते. त्यामुळे शरीरातील पेशींना दुरुस्तीची संधी मिळते. तसेच तणावमुक्त होण्यास मदत होते.

२. शवासनाने शरीराला नवेपणा तर मिळतोच; शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते. हे आसन वर्कआउट पूर्ण करण्यासाठी परफेक्ट आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही खूप मेहनत केली आहे.

३. जेव्हा आपण खूप अधिक वर्काउट करतो तेव्हा त्या वर्काउटचे फायदे आपल्या शरीराला मिळवून देण्यासाठी शवासन महत्त्वाचे कार्य करते.

४. जेव्हा आपले शरीर शांत राहून विश्रांती घेते तेव्हा आपला रक्तदाब कमी होतो. ही स्थिती हृदयाला आराम देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. परिणामी शवासनाने चिंता किंवा अस्वस्थतादेखील नियंत्रित केली जाऊ शकते.

योगनिद्रा : कमी झोपेत जास्त कामाची क्षमता

आज आम्ही तुमच्यासाठी योगनिद्रेचे फायदे घेऊन आलो आहोत. होय, हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तणावही कमी होतो. योगनिद्रेबद्दल असे म्हटले जाते की, ते हृदय आणि मन दोन्हींना शांत करते. विशेष म्हणजे योगनिद्रेच्या माध्यमातून तुम्ही कमी झोप घेऊन जास्तीत जास्त वेळ काम करू शकता आणि ताजेतवाने राहू शकता. योगनिद्रा १० ते ४५ मिनिटे करता येते.

प्राणायाम : श्वासावर नियंत्रण अन् ऑक्सिजनवाढ

प्राणायाम हा शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी योग आहे. होय, या योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होतो. या योगामध्ये व्यक्ती दीर्घ श्वास घेते व सोडते आणि एकंदरीत आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवते. असे केल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात. प्राणायाम केल्याने ऑक्सिजनची पातळी ३७ टक्के वाढते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World yoga day why this asana and pranayama can rid you of depression international yoga day 2024 srk