आज बहुतेक लोकांना पाठदुखीची समस्या भेडसावत आहे आणि प्रत्येक ऋतूमध्ये ही वेदना त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देते. गेल्या काही वर्षांत बैठ्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वय, धकाधकीचे जीवन किंवा खूप व्यायाम यांमुळे लोकांमध्ये पाठदुखीची समस्या वाढत आहे. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की, ते सहन करणे कठीण जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाठीचे दुखणे ही समस्या जगभरात आढळून येत आहे. तसेच तरुण वयातही ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. बायका अन् पाठदुखी हे तर समीकरणच झाले आहे. पाठदुखीची समस्या एवढी व्यापक असली तरी त्याकडे गांभीर्याने मात्र पाहिले जात नाही. मोबाईलचा जास्त वापर केल्याने पाठदुखी, खांदेदुखी आणि मानेमध्ये वेदना होणे इत्यादी समस्या उदभवू शकतात. पाठदुखी घालविण्यासाठी योगा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते का, याच विषयावर ‘अ न्यूरोसायंटिफिक ॲप्रोच टू क्रॉनिक बॅक पेन मॅनेजमेंट’ या अभ्यासाच्या प्रमुख अन्वेषक डॉ. बबिता घई यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : झपाट्याने वजन कमी करायचेय? मग नक्की फॉलो करा तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ स्टेप्स… )

एका अभ्यासातून आढळून आले की, धकाधकीचे जीवन आणि सततचे काम यांमुळे अनेकांना पाठदुखीचा त्रास जडतो. अनेक उपायांनंतरही कोणताही परिणाम दिसून येत नाही किंवा तात्पुरता आराम मिळतो. पण, योगासने यावर चांगला उपाय ठरू शकतात. सर्व योगासने संतुलन, सांधे लवचिकता आणि स्नायूंची ताकद, विशेषतः पाठीचे स्नायू सुधारतात. वेदना आणि अपंगत्व कमी करण्यासाठी विशिष्ट आसने आहेत, जसे की, ताडासन स्ट्रेच, पवन मुक्तासन स्ट्रेच ही योगासने फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या पाठीचे स्नायू लवचिक आणि मजबूत ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा; ज्यामुळे पाठीचे स्नायू लवचिक होतील आणि ते मजबूत होण्यास मदत मिळेल.

भुजंगासन : हे आसन आपल्या आरोग्याासाठी फायदेशीर आहे. हे आसन केल्याने पाठदुखीसह हातांचे स्नायूही मजबूत होतात. त्यासोबतच ही आसने कंबर आणि पोटाची चरबी कमी करण्यास साह्यभूत ठरतात.

सेतुबंधासन : या योगासनामुळे छाती, मान व पाठीचा कणा यांत चांगला ताण निर्माण होतो. तसेच पाठीचा कणा लवचिक बनण्यास मदत होते.

शलभासन : हे आसन केल्यामुळे पाठीच्या स्नायूंची ताकद वाढते, पाठदुखी दूर होते. या आसनामुळे हाडेही मजबूत होतात.

अशा प्रकारे पाठदुखीचा त्रास दूर करण्यासाठी योगसाने फायदेशीर ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga asanas for lower back pain can low back pain go away with yoga know from expert pdb