Arthritis Prevention Tips: संधीवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघे दुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून तुम्हाला सुटका करुन घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.उतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधेदुखी सुरू होणे हे स्वाभाविकच असते. मात्र, धावपळीच्या युगात जीवनशैलीतील काही मोजके बदल, आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो. यंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संधिवातावर योगाचा सकारात्मक प्रभाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज आहे. तसेच व्यायामुळे संधीवात दूर होण्यास मदत होते. परिणामी आपले स्नायु अधिक बळकट होतात. तर सांधे लवचिक राहतात. व्यायामामुळे शरिरातील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होते. याठिकाणी काही सोपी आसने दिली आहेत, पाहुयात…

पवन मुक्तासना

या आसनाद्वारे पायाच्या बोटांपासून मानेच्या भागापर्यंत सर्व सांध्यांच्या हालचाली होतात.

पवन मुक्तासना कसे कराल

  • शरीर सैल ठेवून पाठीवर झोपा
  • तुमचा उजवा पाय दुमडा, हाताच्या बोटांनी पायाची बोटे धरून पाय उजव्या गुडघ्याच्या थोडे खाली घ्या.
  • डावा पाय जमिनीवर सरळ राहू द्या. दुमडलेल्या गुडघ्यांसह, श्वास घ्या व सोडा
  • नंतर तुम्ही श्वास सोडत असताना, तुमचे डोके हळू हळू वर करा आणि उजव्या गुडघ्यावर तुमची हनुवटी, नाक किंवा कपाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
  • जेव्हा तुम्हाला श्वास घ्यायचा असेल तेव्हा तुमचे डोके जमिनीवर परत करा आणि उजवा पाय सरळ करा, डाव्या पायाने हि क्रिया पुन्हा करा.

ताडासन कसे करावे –

  • सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांच्या मध्ये थोडे अंतर ठेवा.
  • दोन्ही हात आपल्या शरिराजवळ सरळ ठेवा.
  • आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर करा आणि हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा.
  • हात सरळ ठेवा आणि ताणून घ्या.
  • तुमच्या दोन्ही पायांची टाच उचला आणि पायाच्या बोटांवर उभे रहा.
  • यादरम्यान तुम्हाला तुमच्या शरिरात पायांपासून हाताच्या बोटांपर्यंत ताण जाणवला पाहिजे.
  • १० सेकंद या स्थितीमध्ये रहा आणि श्वास घेत रहा.
  • आता श्वास सोडताना, तुमच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये या.
  • हे योगासन तुम्ही १० वेळा करा.

मार्जरासन कसे करावे?

  • पाय गुडघ्यात दुमडून खाली बसा. हात जमिनीला लंबरूप ठेवा. शरीराचा भार गुडघे आणि हातांवर येईल. मांजर ज्याप्रमाणे उभी राहते, त्याप्रमाणे ही स्थिती दिसेल.
  • पाठ जमिनीला समांतर आणि सरळ असावी. हाताचे तळवे जमिनीवर समान असावेत. दोन्ही गुडघ्यांमध्ये नितंबांच्या रुंदीइतके अंतर ठेवावे.
  • जसा श्वास आत घेऊ लागता, तशी हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या दिशेला न्यावे. नाभीला खालच्या दिशेला ढकलावे आणि माकडहाडाला वर उचलावे.
  • जसे तुम्ही श्वास सोडू लागता, तसे हनुवटीला छातीकडे आणा आणि पाठीची क्षमतेनुसार कमान करा. या स्थितीत काही वेळ राहा. हळूहळू आसन सोडा.

हेही वाचा >>

अर्ध मत्स्येंद्रसन कसे करावे?

  • पाय पसरवून बसा, दोन्ही पाय एकत्र ठेवा, पाठीचा कणा सरळ असावा.
  • डावा पाय वाकवा आणि डाव्या पायाची टाच उजव्या हिपजवळ ठेवा (किंवा तुम्ही डावा पाय सरळ देखील ठेवू शकता).
  • उजवा पाय समोर डाव्या गुडघ्याच्या वर ठेवा. डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि उजवा हात मागे ठेवा.
  • कंबर, खांदे आणि मान उजवीकडून वळून उजव्या खांद्यावर बघा.
  • पाठीचा कणा सरळ ठेवा. दीर्घ, खोल श्वास घेत ही स्थिती कायम ठेवा.
  • श्वास सोडताना आधी उजवा हात सोडा, नंतर कंबर, नंतर छाती आणि शेवटी मान.
  • आरामात सरळ बसा. दुसऱ्या बाजूने प्रक्रिया पुन्हा करा.
  • श्वास सोडत परत समोर या.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga helps manage rheumatoid arthritis says study here are five asanas to ease pain natural relief from arthritis pain srk
Show comments