Vegetables With High Fiber : चुकीचा आहार सुरु ठेवल्यानंतर पोटाचे विकार आणि आतड्यांच्या आजरांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. शरीरात वाढणारी चरबी आतड्यांच्या आजरांना कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे तुमच्या आहारात असलेल्या पदार्थांमध्ये प्रथिने, कार्ब्स आणि फायबर असणे आवश्यक असतं. मेडिकस न्यूजच्या रिपोर्टनुसार, मोठ्या प्रमाणात फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यावर गट मायक्रोबायोम सुरक्षित राहण्यात मदत होते. आतड्यांच्या समस्या आणि पचन क्रियेत कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी डाएटरी फायबरचं सेवन करणं गरजेचं असतं. यामुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तुम्हाला अशाप्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल, तर काही भाज्यांचे सेवन करणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.
१) ब्रोकोली
ब्रोकोली कोबीच्या भाजीसारखी असते. ब्रोकोलीत विटॅमिन्स, अॅंटिऑक्सीडन्ट, फायबर आणि मिनरल असतात. ब्रोकोली खाल्ल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तसेच बद्धकोष्ठतेसारख्या आजारावर मात करण्यासाठी ब्रोकोलीचं सेवन फायदेशीर ठरु शकतं. ब्रोकोलीय डाएटरी फायबर असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
नक्की वाचा – फळांसोबत चुकूनही खाऊ नका हे ७ पदार्थ, पोटात बनेल भयंकर अॅसिड, किडनीही होईल खराब?
२) पालेभाज्या
पालक आणि काळे भाजी (कोबी) यांच्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. या भाज्या विटॅमिन ए, के आणि सीच्या पोषक तत्वांनी भरलेल्या असतात. या भाजांचं सेवन केल्यावर आतड्यांच्या आजारांपासून सुटका होण्यास मदत मिळते. या भाज्या खाल्ल्यावर आतड्यांमध्ये असलेल्या जीवजंतूचा नायनाट होण्यास मदत होते. तसंच पचनक्रियेतही अडथळा निर्माण होत नाही.
३) शतावरी वनस्पती
शतावरी वनस्पतीच्या भाज्यांचं सेवन केल्यावर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या भाजीत मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने आतड्यांची हालचाल योग्य पद्धतीने राहते. तुमच्या आहारात शतावरी भाजीचा समावेश केल्यावर निरोगी आरोग्य ठेवण्यास मदत होते. तसंचे फायबरची पोषक तत्वांचं सेवन केल्यावर पचनक्रियाही सुधारते.
४) गाजर
गाजरामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतात. गाजक खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येऊ शकते. तुमच्या आहारात गाजराचा समावेश करुणं खूप महत्वाचं आहे. कारण गाजर खाल्ल्याने शरीरीत आतड्यांची हालचाल सुरळीत राहण्यास मदत मिळते. तसंच गाजराच्या सेवनामुळं हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळ्यांच्या समस्याही निर्माण होत नाहीत.
५) बीट
बीटाच्या भाजीतही मोठ्या प्रमाणात फायबर असतात. बीट खाल्ल्याने पचनक्रियाही चांगली राहते. बीटरुटचं सेवन केल्यानं पचनक्रिया तर चांगली राहतेच पण बद्धकोष्ठतेसारख्या आजारांसाठी बीट रामबाण औषध ठरु शकतं. तसेच आतड्यांच्या आजारांपासूनही सुटका होण्यास मदत मिळते.