High Cholesterol Level In Body : शरीरात जास्त प्रमाणात असेलेलं कोलेस्ट्रोल अनेक घटकांवर अवलंबून असतं. बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, वाढतं वय आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ज्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रोल असतं, त्यांना हृदयरोग होऊ शकतो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर मात केली नाही आणि दिवसेंदिवस कोस्ट्रेलचं प्रमाण वाढतच गेलं, तर तुम्हाला हृदय विकाराचा झटकाही येऊ शकतो. शरीरात असलेलं कोलेस्ट्रॉल १० टक्क्यांनी कमी झालं, तर तुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता २०-३० टक्क्यांनी कमी होते. औषधोपचार करून कोलेस्ट्रोलचं प्रमाण कमी करु शकता. तसंच आरोग्यासंबंधीत काही चांगल्या सवयी तुम्हाला कोलेस्ट्रोलचं प्रमाण कमी करण्यास मदत करु शकतात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
सकस आहाराची आवश्यकता
ब्रेड, पास्ता आणि अन्यधान्याचं सेवन केल्यावर तुमच्या शरीरातील ब्लड शुगरचं प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे शरीरातील एलडीएलचं (LDl) प्रमाणही कमी होऊ शकतं. तुम्हाला आरोग्य सुदृढ करायचं असेल, तर तुमच्या रोजच्या आहारात फळांचा आणि भाजांचा समावेश करण्याची गरज आहे.
नक्की वाचा – पोटाचे विकार आणि आतड्यांच्या आजारापासून होईल सुटका? फक्त या भाज्या खायला विसरु नका
चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा
ज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असंत, अशा पदार्थांचा आहारात समावेश करु नका. या पदार्थांचं सेवन केल्यावर एलडीएल कोलेस्ट्रोलचं प्रमाणं वाढतं, ज्यामुळे शारीरीक समस्या निर्माण होतात. तसंच ट्रान्स फॅटचा समावेश असलेले पदार्थही खाऊ नयेत. कारण अशा पदार्थांच्या सेवनामुळं एलडीएल आणि एचडीएल सारखे घातल कोलेस्ट्रोल वाढण्यात मदत मिळते. ज्या पदार्थामध्ये सॅच्युरेटेड फॅट नसतं, त्या पदार्थांच सेवन करु शकता. उदा. मासे, काजू आणि वेजिटेबल ऑईल.
दररोज व्यायाम करा
व्यायाम केल्यावर शरीराला अनेक फायदे होतात. दररोज व्यायाम केल्यावर शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होतं. सकस आहार, वजनावर नियंत्रण ठेवणं आणि व्यायाम करु सक्रीय राहिल्यावर आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. डायबिटीज आणि लठ्ठपणा सारख्या गंभीर समस्याही उद्धवत नाहीत. दररोज योग्य पद्धतीने व्यायाम करुन वजन कमी केल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीत आजांरांवरही मात केली जाऊ शकते.
धुम्रपान करु नका
धुम्रपान केल्यावर शारीरक समस्या निर्माण होतात. शरीरातील एचडीएल कोलेस्ट्रॉलही वाढतं. धुम्रपान केल्यावर हदयविकारांची समस्या निर्माण होते. तसंच डायिबिटीज आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्याही धुम्रपान केल्यानं डोकं वर काढतात. त्यामुळे धुम्रपान करणे आरोग्यासाठी घातक ठरतं. धुम्रपान करणे सोडल्यास शरीरातील धमण्याही निरोगी राहतात.
अल्कोहोलचं सेवन करु नका
अल्कोहोलचं सेवन केल्यावर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रोलचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं. तुम्हाला दारु पिण्याची सवय असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दारुच्या व्यसनामुळं आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. ब्लड प्रेशर, हृदय विकाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अल्कोहोलचं सेवन केल्यावर एचडीएल कोलेस्ट्रोलचं प्रमाण वाढतं.