weight loss without diet and exercise: दैनंदिन जीवनात आपण कार्यालयीन कामात तसेच घरातील कामांमध्ये नेहमी व्यग्र असतो. त्यामुळे आपल्याला नियमित व्यायाम आणि आहार सुरु ठेवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण, तुम्हाला आता घाबरण्याची काहीच गरज नाहीय. आता तुम्ही डाएट आणि व्यायाम न करता वजन कमी करु शकता. यासाठी तुम्हाला या पाच गोष्टी फॉलो कराव्या लागतील. जेणेकरून तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. तुमचं वयोवृद्ध असल्यास व्यायाम केल्यावर काही प्रमाणात आरोग्याच्या समस्या उद्धवू शकतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खाली दिलेल्या पाच टीप्स फॉलो करा.

१) मैदाच्या व्यतिरिक्त कोंड्याचं पीठ

हेल्थ लाईनने दिलेल्या माहितीनुसार, मैदा, सफेद ब्रेड, पास्ता आणि अन्य रिफाइंड कार्ब्सपासूनही दूर राहिलं पाहिजे. रिफाइंड कार्ब्समधून पोषक तत्व आणि फायबरला हटवलं जातं. यामुळं आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे कोंड्याच्या पीठाचा वापर करा आणि मैदा खाणे बंद करा.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Actress Deepti Sadhwani weight loss journey
‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन
Morning Mantra
Morning Mantra: मॉर्निंग वॉक करताना चालावे की धावावे? वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम ठरेल जास्त फायदेशीर?
How Less Exercise give Better Health Benefits
हिवाळ्यात कमी वर्कआउट करून आरोग्यास कसा फायदा मिळू शकतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
how to to Manage thyroid level
थायरॉइड कमी करण्यासाठी दररोज करा हा व्यायाम, Viral Video एकदा पाहाच

आणखी वाचा – Suryakumar Yadav : कसोटी क्रिकेटमध्येही भारताचा ‘सूर्या’ लवकरच तळपणार, म्हणाला, “आ रहा है, आ रहा है…”

२) गरम आणि शुद्ध पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला खूप पाणी पिणे गरजेचं आहे. कारण पाण्यामुळं शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर टाकले जातात. तसंच गरम पाणी पिण्यामुळं शरीरातील चरबी कमी होते. विशेषत: रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिणे अत्यावश्यक आहे. त्यामुळं शरीरातील मेटाबॉलिझम चांगला राहतो आणि याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.

3) गोड खाणं बंद करा

वजन कमी करण्यासाठी साखरे न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं अन्न पचनाची गती कमी होते. याचा थेट परिणाम वजनावर होतो. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असल्यास, तुम्ही साखरेच्या पदार्थांचं सेवन कमी करा. गोड खाण्याऐवजी गुळ आणि मधाचं सेवन करणं गुणकारी ठरेल.

आणखी वाचा – तरुणीचा नाद नाय! हाताने नाही तर चक्क पायानेच आकाशात सोडला बाण, Viral Video पाहून म्हणाल, वाह वाह

४) ग्रीन टी आणि अन्य गरम पेय

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. यामुळं शरीरातील फॅट कमी होतं. दोन किंवा तीन ग्रीन टी नियमीतपणे घेतल्यास शरीराचं मेटाबॉलिझमही वाढलं जातं आणि शरीर डिटॉक्सीफाय होतं. तसंच तुम्ही मध किंवा लिंबू मिश्रित गरम पाणी पिऊ शकता. कारण यामुळं तुमच्या शरीराची पचन क्रिया चांगली होते.

५) रिफाइंड तेलाचा वापर कमी करा

वजन कमी करण्यासाठी आहारात तेलाचा वापर कमी करायचा असतो. जेवन बनवताना रिफाइंड तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे चुकीचे आहे. तुम्ही मूंगफळीचा तेल, राइसब्रेनच्या तेलाचा वापर करु शकता. रिफाइंड तेलाच्या वापरामुळं वजन कमी होण्याऐवजी ते वाढण्यास मदत मिळते. त्यामुळं आहारात रिफाइंड तेलाचा वापर कमी करा.

Story img Loader