Hot meal food in summer: गरम गरम जेवायला कुणाला नाही आवडत? घरच्या गरम गरम जेवणावर ताव मारायला सर्वच नेहमी तयार असतात. काहींना तर नेहमीच गरम अन्न आवडते, मग हिवाळा असो किंवा उन्हाळा, अशा लोकांना नेहमीच गरम अन्न खायला आवडते. ही सवय हिवाळ्यात चांगली असते, मात्र उन्हाळ्यातही हे कायम राहिल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यातही जर तुम्ही गरम अन्न खात असाल तर आधी त्याचे तोटे लक्षात घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात गरमा गरम जेवणाचे तोटे.
जीभ भाजण्याचा धोका –
उन्हाळ्यातही गरम अन्न खाल्ले तर जीभ भाजण्याचा धोका असतो. इतकंच नाही तर खूप गरम खाल्ल्याने दातांनाही इजा होऊ शकते. बरेचदा खूप गरम अन्न खाल्ल्याने आपल्या टाळूलाही इजा होते आणि त्यावर फोड येतात किंवा त्वचा फाटते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जास्त गरम अन्न खाल्ल्याने घशात सूज येऊ शकते आणि अन्न नलीमध्ये समस्या देखील उद्भवू शकतात.
दातांना नुकसान –
हेल्थ एक्स्पोर्टचे असेही मत आहे की खूप गरम किंवा खूप थंड अन्न खाणे दातांसाठी हानिकारक असू शकते. खूप गरम अन्न खाल्ल्याने दातांमधील इनॅमल खराब होण्याची शक्यता असते. यामुळे दातांचे आरोग्य बिघडते तसेच दातांच्या सौंदर्यावरही वाईट परिणाम होतो.
आतड्यांना इजा होऊ शकते –
उन्हाळ्यात गरम अन्न खाल्ल्याने आतड्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. वास्तविक, जेव्हा खूप गरम अन्न पोटात जाते तेव्हा ते जास्त काळ थंड होत नाही आणि त्यामुळे आतड्यांनाही जळजळीचा सामना करावा लागतो.
पोटाला नुकसान –
उन्हाळ्यात आधीच पोटाची उष्णता जास्त असते, अशा परिस्थितीत गरम अन्न खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोटाची त्वचा जळू शकते किंवा फोड आणि पोटात जळजळ होण्याचा धोका वाढतो.या ऋतूमध्ये शरीरात जे काही जाते, ते शरीर आधी त्याचे तापमान थंड करते आणि नंतर ते पचवते. गरम अन्न खाल्ल्यानंतर उन्हाळ्यात शरीराला थंड होण्यासाठी जास्त मेहनत आणि वेळ लागतो आणि या काळात अन्न पचण्यास खूप त्रास होतो. अशा स्थितीत पोटात जळजळ, मळमळ आणि उलट्या होण्याचा धोका असतो.