Mobile Phone Radiation and Health : बऱ्याच लोकांना झोपताना मोबाईल आपल्या उशीजवळ किंवा पलंगावर घेऊन झोपण्याची सवय असते. कदाचित ही सवय तुमच्यापैकी अनेकांना असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का, ही सवय किती धोकादायक ठरू शकते. मोबाईल उशापाशी घेऊन झोपल्याने तुमची तब्येतच बिघडत नाही तर यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतची माहिती दिली आहे. बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर तुमचा मूड खराब असतो, त्याचे कारण देखील मोबाईलमधून निघणारे रिडिएशन असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला जाणून खोट वाटेल, पण तुम्ही झोपताना मोबाईल उशापाशी ठेवून स्वत:च्या मनाचे नुकसान करत आहात. डोकेदुखी, स्नायूदुखी आणि इतर आरोग्यासंबंधीत आजारांचे मूळ कारण मोबाईलमधून निघणारे रेडिएशन आहेत.

व्यक्ती वारंवार त्याच चुका का करतो? नंतर त्या सवयी कशा सोडतो? शास्त्रज्ञांनी शोधले उत्तर

फोन उशापाशी घेऊन झोपण्याचा आणि कर्करोगाचा काय संबंध आहे?

मोबाईलच्या रेडिएशनमुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मोबाईलमधील रेडिएशनमुळे तुम्ही इरेक्टाइल डिसफंक्शनतेही बळी ठरू शकता. त्यातील रेडिएशनचा बॉडी क्लॉकवरही परिणाम होतो. या सर्व सामान्य समस्या आहेत. पण जागितक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, मोबाईलमधून बाहेर पडणारे विशेष प्रकारचे रेडिएशन, ज्याला आरएफ रेडिएशन असे म्हणतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवत असाल तर काळजी घ्या.

झोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा?

जर तुम्हाला झोपताना मोबाईल बेडवर ठेवायचा नाही तर तो आपल्यापासून किती दूर ठेवायाचा असा प्रश्न पडला असेल. जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा मोबाईल तुमच्यापासून किमान तीन फूट दूर ठेवा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. यामुळे तुम्ही मोबाईलच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रो-मॅग्नेटिक फील्ड आणि धोकादायक रेडिएशनपासून दूर राहील.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You should sleeping with your phone in bed cancer due to radition of phone sjr