डिस्पोजेबल पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफीसारखी गरम पेये पिणे सामान्य गोष्ट आहे. पण काही लोक असा दावा करतात की, “असे केल्याने मायक्रोप्लास्टिक कण पोटात जाऊ शकतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अलीकडेच, महाराष्ट्रातील बुलढाणा शहरात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पेपर कपवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. एका निवेदनात त्यांनी दावा केला की, “पेपर कप हे कर्करोगाच्या वाढत्या घटनांमागील मुख्य कारण आहे.” या दाव्याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे हे जाणून घेऊ या…

रोज पेपर कपमध्ये चहा-कॉफी पिणे सुरक्षित आहे का हे वादविवाद सुरू असताना याबाबत द इंडियन एक्स्प्रेसमध्ये मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स ऑन्कोसर्जन, सल्लागार डॉ. तीर्थराज कौशिक यांनी सांगितले की, “कपचा कर्करोगाशी थेट संबंध नसला तरी कप तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली रसायने जसे की, मायक्रोप्लास्टिक्स किंवा परफ्लुरोआल्काइल पदार्थ (PFAS) यांमुळे कर्करोग होऊ शकतो.”

मायक्रोप्लास्टिक्स हे प्लास्टिकपासून बनवलेले सूक्ष्म कण आहेत, जे आपल्या नैसर्गिक वातावरणात अडकले आहेत. मानवाच्या जैविक परिसंस्थेशी त्यांचा परस्पर संवाद यावर संशोधन सुरू आहे, असे नवी दिल्ली द्वारका येथील मणिपाल हॉस्पिटल, मेडिकल ऑन्कोलॉजी सल्लागार डॉ. मृदुल मल्होत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

हेही वाचा –सुपरफूड्स खरोखरच सुपरफूड आहेत का? तुमच्या आहाराचे नियोजन कसे करावे ते तज्ज्ञांकडून घ्या जाणून….

डॉ. मल्होत्रा म्हणाले की, “मायक्रोप्लास्टिक विविध मार्गांद्वारे कार्सिनोजेन्समध्ये योगदान देऊ शकते:

  • रासायनिक रचना दूषित : मायक्रोप्लास्टिक्स मानवी शरीरातील ऊतींमध्ये कार्सिनोजेन असलेली रसायने वाहून आणि वितरीत (carry and deliver) करू शकतात.
  • दाहकता : मायक्रोप्लास्टिक्स सेल्युलर बदलांना प्रेरित करू शकतात, ज्यामुळे शरीरात कर्करोग होऊ शकतो.
  • श्लेष्माच्या थरात व्यत्यय आणणे : मायक्रोप्लास्टिक्स श्लेष्माच्या थराला, विशेषतः गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि मानवी शरीराच्या संरक्षणात्मक अडथळ्यांशी तडजोड करू शकतात.

हे देखील सत्य आहे की, “जेव्हा पेपर कपमध्ये कोणतेही गरम पेय दिले जाते तेव्हा काही पदार्थ पेयामध्ये शोषले जाऊ शकतात, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होईल अशी चिंता निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. कौशिक यांनी केले. “हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वर्तमान संशोधनाने निश्चितपणे सिद्ध केलेले नाही की, “पेपर कपच्या अधूनमधून वापरामुळे कर्करोग होतो. या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नाही,” असेही डॉ. कौशिक यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – अल्लू अर्जुनने सांगितले आहारासह फिट राहण्याचे रहस्य, “रोज सकाळी रिकाम्या पोटी….”; तज्ज्ञांचे मत काय?

ऑगस्ट २०२४ च्या अभ्यासाचा दाखला देत डॉ. मल्होत्रा म्हणाले की, “प्लास्टिक-लेपित पेपर कपमध्ये गरम द्रवपदार्थ फक्त १५ मिनिटांसाठी ठेवल्यास अंदाजे २५,००० लहान प्लास्टिकचे कण बाहेर पडू शकतात. डॉक्टर मल्होत्रा म्हणाले, “ज्या व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात जवळपास तीन कप गरम पेये पितात, त्यांच्या शरीरात जवळपास ७५,००० अदृश्य प्लास्टिकचे कण प्रवेश करू शकतात.

पेपर कपच्या फायद्याबाबत बोलायचे झाल्यास ते वापरण्यास सोयीस्कर आणि हलके डिझाइन आहे आणि तोटा म्हणजे पेपर कपमध्ये रसायने असू शकतात, जी एकदा वापरल्या जाणाऱ्या कचऱ्यापासून पर्यावरणाची चिंता वाढवू शकतात. सुरक्षित वापरासाठी, BPA-मुक्त लेबल असलेल्या पेपर कपची निवड करा आणि पर्यावरणावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी पुन्हा वापरता येण्या जोग्या पर्याय जसे सिरॅमिक कप वापरण्याचा विचार करा,” असे डॉ. कौशिक यांनी सुचवले.

डॉ. मल्होत्रा यांच्या मते, अन्नामध्ये मायक्रोप्लास्टिक्स टाळण्यासाठी काही सावधगिरीचे उपाय आहेत:

  • काचेची किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी वापरणे.
  • प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करणे टाळा.
  • मायक्रोवेव्ह-सुरक्षित कंटेनर निवडा.
  • एकदा वापरून टाकून दिले जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे.
  • फिल्टर केलेल्या स्त्रोतांचे पाणी पिणे.

हेही वाचा – अंतराळवीरांना अवकाशात ‘मोशन सिकनेस’चा अनुभव येतो का? तज्ज्ञांनी केला खुलासा…

वैद्यकीय आणि वैज्ञानिक समुदाय मायक्रोप्लास्टिक्सच्या प्रभावावर सक्रियपणे संशोधन करत आहे. “अलीकडील अभ्यास संभाव्य जोखीम आणि निश्चित कारणात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दीर्घकालीन संशोधनाची आवश्यकता दर्शवितात,” असे डॉ. मल्होत्रा म्हणाले.

टीप : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि/किंवा आम्हाला तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.

Story img Loader