How Much Sugar Does Your Body Need: साखर, एक असा घटक जो साधारण प्रत्येक पदार्थात कमी अधिक प्रमाणात आढळून येतोच. अर्थात थोडा गोडवा आपला मूड आनंदी करू शकतो, ताण दूर करू शकतो पण इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे साखरेचे अतिसेवन केल्याने ती आपल्या शरीरात पांढऱ्या विषाप्रमाणे काम करू शकते. आता मुद्दा हा की अतिसेवन म्हणजे काय? म्हणजे आपण खात असताना तर असा विचार करत नाही की, या मर्यादेच्या पलीकडे म्हणजे अतिसेवन, या मर्यादेच्या अलीकडे म्हणजे कमी सेवन, मुळात ही मर्यादा काय हेच आपल्याला अनेकदा ठाऊक नसतं, आज आपण आपल्या शरीराला किती प्रमाणात साखरेची आवश्यकता असते व त्यापलीकडे खाल्लेली साखर शरीरात नेमके काय बदल घडवते हे जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
साखर आवश्यकच, पण किती?
सुरुवात आपण चांगल्या मुद्द्यापासून करू, तुम्हाला माहित आहे का, लोकप्रिय समजुतीच्या अगदी विरुद्ध साखर ही शरीरासाठी पूर्ण घातक नसते. उलट आपल्या शरीरालाच काही प्रमाणात साखरेची गरज असते. ही साखर (ग्लुकोज) आपल्या पेशींसाठी प्राथनिक इंधन स्रोत म्हणून काम करते.
कनिक्का मल्होत्रा, क्लिनिकल पोषणतज्ञ आणि मधुमेह प्रशिक्षक यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, ग्लुकोज प्रामुख्याने तुमच्या आहारातील कर्बोदकांमधे मिळते, परंतु तुमचे यकृत सुद्धा काही प्रमाणात स्वतः ग्लुकोज तयार करू शकते. तुमच्या शरीराला ग्लुकोजच्या स्वरूपात फक्त ५ ग्रॅम साखरेची गरज असते. आता हे खरं असलं तरी तुमचं शरीर किती प्रमाणात साखरेवर प्रक्रिया करू शकतं यावरून सुद्धा अनेक गोष्टी ठरत असतात.
एका निरोगी व्यक्तीमध्ये, स्वादुपिंडाद्वारे तयार केले जाणारे हार्मोन म्हणजे इन्सुलिन हे ग्लुकोजला पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि ऊर्जेसाठी खर्ची करण्यासाठी शरीराला मदत करते. तर मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये, एकतर शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशीच इन्सुलिनच्या प्रभावाला प्रतिरोधक होतात. यामुळे रक्तप्रवाहात साखरेचे प्रमाण वाढते, ही स्थिती हायपरग्लाइसेमिया म्हणून ओळखली जाते.
अतिसेवन केलेली साखर कुठे जाते?
मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, जेव्हा तुम्ही जास्त साखरेचे सेवन करता तेव्हा तुमचे शरीर उर्जेसाठी त्याचा वापर करण्यास प्राधान्य देते. यकृत यातील काही ग्लुकोज (ग्लायकोजेन) सहज उपलब्ध होणारा ऊर्जा स्त्रोत म्हणून साठवू शकते. मात्र हे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास, अतिरिक्त साखर चरबीमध्ये रूपांतरित होते आणि संपूर्ण शरीरात साठते. हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते तसेच हृदयविकार, टाइप 2 मधुमेह आणि काही कर्करोग यासारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका यामुळे वाढतो.
ग्लुकोज होमिओस्टॅसिस आवश्यक, पण म्हणजे काय?
ग्लुकोज होमिओस्टॅसिस म्हणजे रक्तातील साखरेची पातळी मर्यादेत ठेवण्याची शरीराची प्रक्रिया. मल्होत्रा यांच्या मते, इन्सुलिन आणि ग्लुकागॉन सारख्या हार्मोन्सच्या एकत्रित प्रक्रियेत हे संतुलन राखण्यासाठी जीवनशैलीतील काही बदल मदत करू शकतात. हे बदल खालीलप्रमाणे..
संतुलित आहार घ्या: फळे, भाज्या, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स (संपूर्ण धान्य, शेंगा), पातळ प्रथिने आणि निरोगी फॅट्स यासारख्या संपूर्ण व प्रक्रिया न केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ शाश्वत ऊर्जा प्रदान करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात.
वजनावर नियंत्रण ठेवा : शरीराचे जास्त वजन इन्सुलिनला प्रतिकार करू शकते. वजन नियंत्रणात ठेवल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
नियमित व्यायाम करा: शारीरिक व्यायाम तुमच्या शरीराला ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास मदत करू शकतो, यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
तुमचे शरीर साखरेवर प्रक्रिया कशी करते हे समजून घेऊन आणि ग्लुकोजच्या योग्य वापरासाठी आपण प्रयत्न करायला हवे. यासाठी तुम्ही आहारावर व त्याजोडीने व्यायामावर भर द्यायला हवा.