Feet say the health secret: डोळ्यांपासून ते पायांपर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा असतो. तसेच तुमचे तळपाय तुमच्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकतात आणि त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या आरोग्य समस्यांकडे संकेत देऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर सविस्तरपणे बोलताना, आहारतज्ज्ञ निधी गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर सामान्य आरोग्य समस्या शेअर केल्या, ज्याची पहिली लक्षणे पायांवर दिसतात असे त्यांचे मत होते. याच्याशी सहमती दर्शवत, परळ, मुंबई येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अनुप खत्री म्हणाले की, “या समस्येमागील मूळ कारणांचे मूल्यांकन करणे आणि नंतर वेळेवर उपचार सुरू करणे ही काळाची गरज आहे. आहाराकडे लक्ष देणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे,” असे डॉ. खत्री म्हणाले.

काही सामान्य संकेत असे आहेत

सूज : पायांना सूज येणे हे मूत्रपिंडाचे कार्य कमी असणे, हृदयरोग, यकृताचे आजार किंवा गर्भधारणा दर्शवू शकते. “संधिवात आणि व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे घोट्यात वेदना होऊ शकतात,” असे डॉ. अनुप खत्री म्हणाले.

स्पायडर व्हेन्स : हे बहुतेकदा उच्च इस्ट्रोजेन पातळी, गर्भनिरोधक गोळ्या किंवा गर्भधारणेशी जोडलेले असते. जर तुम्हीही हे अनुभवत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे आहे, असे गुप्ता म्हणाल्या.

पायांना भेगा : व्हिटॅमिन बी २ (रिबोफ्लेविन), बी ३ (नियासीनामाइड) आणि ओमेगा-३ च्या कमतरतेचे हे एक सामान्य लक्षण आहे. “पूरक आहाराद्वारे या व्हिटॅमिनचे पुरेसे सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते,” असे गुप्ता म्हणाल्या.

डॉ. खत्री म्हणाले की, “व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता मज्जातंतूंशी संबंधित अस्वस्थता आणि मुंग्या येणे याद्वारे निर्माण होऊ शकते. तसेच फॅटी अॅसिडचे, विशेषतः ओमेगा-३ चे अपुरे सेवन हे निरोगी फॅट्स त्वचेची लवचिकता आणि हायड्रेशन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.”

मुंग्या येणे आणि सुन्न होणे : ही लक्षणे व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचे संकेत देऊ शकतात. “आहारातील बदल किंवा पूरक आहाराद्वारे ही कमतरता दूर केल्याने या संवेदना कमी होऊ शकतात,” असे गुप्ता म्हणाल्या.

पाय गार पडणे : हे आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा अशक्तपणामुळे असू शकते. “पुरेसे आयोडीन सेवन सुनिश्चित करणे आणि कोणत्याही संभाव्य अशक्तपणाला तोंड देण्यास मदत करू शकते,” असे गुप्ता म्हणाल्या.

स्नायूंमध्ये वेदना : हे बहुतेकदा मॅग्नेशियमच्या कमतरतेशी संबंधित असतात, असे डॉ. गुप्ता म्हणाले. मॅग्नेशियमयुक्त पदार्थ किंवा पूरक आहार घेतल्याने स्नायूंमध्ये वेदना कमी होण्यास मदत होते. याच्याशी सहमती दर्शवत, डॉ. खत्री म्हणाले की, यासाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे आणि पालक, क्विनोआ आणि एवोकॅडो यांसारखे मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.