मुक्ता चैतन्य
टीनएजर्स काय वाचतात याचं कुतूहल बहुतेक सगळ्यांना आज आहे. मुलं वाचत नाहीत असं तुणतुणं लावण्याची सवयही आहे. पण मुलांच्या ऑनलाईन जगातल्या भटकंतीमध्ये सहभागी झालं की लक्षात येतं किशोरवयीन आणि तरुण तरुणींमध्ये wattapad हा प्लॅटफॉर्म महत्वपूर्ण बनलेला आहे.
Wattapad विविध प्रकारच्या कथा आणि लहान मोठ्या कादंबऱ्या वाचनासाठी उपलब्ध आहेत आणि मुलांपासून तरुणाईपर्यंत सगळे जण इथे त्यांच्या आवडीचे प्रकार वाचनासाठी येतात. Wattapad ला भारतात येऊन आता दहाहून अधिक वर्ष उलटून गेलेली आहेत. भारतात अंदाजे २६ लाखाच्या आसपास युजर्स असून ४ लाखाहून अधिक गोष्टी या प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या आहेत. इथे तुम्ही लेखकही असता आणि वाचकही. आणि यात तरुण आणि किशोरवयीनांची संख्या सर्वाधिक आहे. हिंदी, मल्याळम, तामिळ, उर्दू, बंगाली, गुजराती, पंजाबी, असामी आणि मराठी भाषांमध्ये या कथा उपलब्ध आहेत. भारत wattpad ची सगळ्यात मोठी बाजारपेठ होऊ बघतंय. २०१९ मध्ये पहिल्यांदा या प्लॅटफॉर्मने लेखनाचे पुरस्कारही भारतात देऊ केले होते. याचा अर्थ असा होतो की तरुण पिढी आणि जेन झी पिढीमध्ये वाचनाचा अभाव नाहीये. मराठीत अजूनही पुस्तक प्रकाशन या पलीकडे नव्या पिढींच्या प्लॅटफॉर्म्सचा गांभीर्याने विचार होत नाही. आणि मग वरकरणी पिढी वाचत नाही, वाचक उपलब्ध नाहीत याची कुरकुर मात्र केली जाते.
आणखी वाचा-सणांचा उत्साह आणि मानसिक दडपण
Wattpad प्रामुख्याने फिक्शन प्लॅटफॉर्म आहे. इथे जगभरातलं कुणीही काहीही लिहू शकतं. यात सर्वप्रकारच्या कंटेट उपलब्ध आहे. अगदी थ्रिलरपासून पॉर्न पर्यंत सर्व प्रकारचे कथालेखन वाचायला मिळते. या अॅपवर दोन रेटिंग्स आहे. एक १३+ आणि दुसरं ‘मॅच्युअर’ म्हणजे १७+. रोमान्स आणि फॅन फिक्शनला प्रचंड मागणी आहे. कारण वाचणारा सगळा तरुण वर्ग आहे. या दोन्ही प्रकारात मोठ्या प्रमाणावर पॉर्न कंटेट लिहिला जातो आणि टिनेजर्स तो वाचतात. अगदी नोबिता आणि शिजूकाच्या रोमान्टिक किंवा काहीशा सेक्शुअल कथाही फॅनफिक्शन प्रकारात वाचायला उपलब्ध आहेत.
Wattpad चा पसारा दिवसेंदिवस वाढतोय. इथे अगदी दहा बारा वर्षांची मुलंही फिक्शन लिहितात. म्हणूनच Wattpadला घेऊन वादही आहेत. जगभरातला सगळ्यात मोठा आक्षेपांचा विषय म्हणजे इथे सहज उपलब्ध असलेलं इरॉटिक मटेरियल. लैंगिक संबंधांची वर्णने करणारा, लिखित स्वरूपातला पॉर्न कन्टेन्ट इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि तो कुणालाही सहज वाचता येऊ शकतो. लहान मुलं आणि तरुण वर्ग पॉर्न साठी फक्त पॉर्न साईट्सवर जातोय असं मानण्याचं कारण नाही. ते Wattpad वरही अनेकदा याच कारणासाठी येतोय. खरंतर १३ वर्षखालील कुणालाही या प्लॅटफॉर्मवर येण्यास परवानगी नाही. पण जे इन्स्टा किंवा इतर अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सच आहे तेच Wattpad बाबत घडतंय. मुलं त्यांच्या जन्म तारखा बदलून १३ + होऊन या प्लॅटफॉर्मवर येतायेत. आणि त्यांना सगळा ऍडल्ट कन्टेन्ट सहज उपलब्ध होतोय. त्यात सेक्शुअल कन्टेन्ट आहे. अब्युसीव्ह आणि अगदी पीडोफाईल लोकांसाठी तयार झालेला कंटेंटही उपलब्ध आहे. जे मुलांसाठी हानिकारक आहे. पण सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जो प्रॉब्लेम आहे तोच याही प्लॅटफॉर्मचा आहे. येणारा खरंच १३ वर्ष पूर्ण आहे की नाही हे तपासण्याची कुठलीही व्यवस्था इथे नाही. इथे येणारा प्रत्येक जण लेखक आणि वाचक असू शकतो म्हणूनच हा प्लॅटफॉर्म स्वतःला ‘सोशल स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म’ म्हणवून घेतो.
आणखी वाचा-Health Special : उजेड सहन न होणं हे पित्तप्रकोपाचं लक्षण आहे का?
टीनएजर्सचं जग झपाट्याने बदलणारं आहे. बदलत आहे. आपली मुलं काय बघतात, काय वाचतात, ऑनलाईन जगात काय जाऊन करतात याचे सतत २४/७ अपडेट्स मिळवणं शक्य नाही, तसं ते योग्यही नाहीये. पण आभासी जग हे खऱ्या जागाइतकंच सत्य जग आहे. ती काही एखादी खोटी आणि कृत्रिम जागा नाहीये. त्याचे बरेवाईट परिणाम आपल्यावर होणार आहेत याची जाणीव जरी आपण आपल्या मुलांना करुन देऊ शकलो तरी ‘डिजिटल विवेक’ विकसित करण्याच्या दिशेने एक महत्वाचे आणि भक्कम पाऊल आपल्याला उचलता येईल. आपल्या मुलांसाठी आपण इतपत करणं लागतोच.