Weak sense of smell indicates heart problems : करोना महामारीला चार वर्ष पूर्ण झाली असली तरीही अनेकांना त्या काळात बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला आहे. काही जणांना या दरम्यान कोणत्याही गोष्टींचा वास येत नव्हता, तर काही जणांच्या जिभेवरची चवसुद्धा कमी झाली होती. यातले काही जण बरे झाले आहेत, पण काही जण अशाच काही समस्यांना अजूनही तोंड देत आहेत. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, ‘वास व चव’ या दोन संवेदना (Weak sense of smell) ओळखण्यात तारांबळ उडणे वृद्ध प्रौढांमध्ये एक सामान्य समस्या आहे. पण, ही बाब हृदयविकार असण्याचे संकेत दर्शवू शकते.

तर याचबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने क्लिनिकल तज्ज्ञांशी संवाद साधला. वास येण्याची क्षमता कमी होणं हे खरोखरच हृदयाच्या संबंधित समस्या दर्शवते का? आणि हे खरं असेल तर हे टाळण्यासाठी काय केले जाऊ शकते, याबद्दल अधिक जाणून घेतलं.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

तर याबद्दल चर्चा करताना ‘वास न येणं किंवा पूर्ण जाणं ‘ हे हृदयविकार रोगाचे सुरवातीचे लक्षण असू शकते, असे निदर्शनास आले. वास येण्याची क्षमता कमी होणं किंवा पूर्ण जाणं हे न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांच्या सुरुवातीच्या प्रक्रियेशी आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी पॅथॉलॉजीजसारख्या सामान्य रोगांशी संबंधित असू शकते; असे बंगळुरूच्या ॲस्टर व्हाईटफील्ड हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल सल्लागार डॉक्टर चिराग डी. म्हणाले आहेत.

हेही वाचा…Dark Circles: तुमच्या डोळ्यांखाली का येतात काळी वर्तुळं? डॉक्टरांकडून जाणून घ्या ‘ही’ पाच कारणं अन् आजच करा तुमच्या सवयीत बदल

पण असं का घडतं?

वास घेण्याची क्षमता ही हृदयविकारातील दुवा, रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. गंध ओळखण्याची क्षमता नाकावाटे रक्ताच्या सामान्य प्रवाहावर आणि आकलनासाठी जबाबदार असलेल्या इतर भागांवर अवलंबून असते. न्यूरोडीजनरेटिव्ह प्रक्रिया एकाच वेळी हृदय आणि नाक या दोन्ही मार्गांवर परिणाम करतात, असे डॉक्टर चिराग डी. म्हणाले आहेत.

अस्तर आरव्ही (Aster RV) हॉस्पिटलमधील CTVS शस्त्रक्रिया करणारे सल्लागार डॉक्टर दिवाकर भट यांनीसुद्धा वरील गोष्टींवर सहमती दर्शविली आहे. त्यांच्या मते, अत्यंत कमकुवत हृदय असलेल्या व्यक्तींमध्ये, नाकावाटे मज्जातंतू क्षेत्रासह, शरीराच्या सर्व अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो, जी वासाची भावना व्यक्त करणारा एकमेव मार्ग आहे; यामुळे गंधाची भावना कमी होऊ शकते.

कमी वास येणं किंवा वास न येणं हे Nasal Issues, नाकाच्या मज्जातंतूवर परिणाम करणारी मेंदूची स्थिती किंवा COVID-19 यांचा समावेश होतो. त्याचा हृदयाच्या कार्याशी संबंध नाही; असेही डॉक्टर दिवाकर भट म्हणाले आहेत.

हेही वाचा…सर्दी, खोकला झाल्यावर तुम्हीसुद्धा दूध पिणं टाळता का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या खरं कारण अन् त्यावरील उपाय

कमी वास येणं किंवा वास न येणं म्हणजे काय? (Weak Sense Of Smell) :

“यूपीएसआयटी (युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्मेल आयडेंटिफिकेशन टेस्ट) किंवा स्निफिन स्टिक्स टेस्ट यांसारख्या चाचण्या हायपोस्मिया किंवा कमी वासाची भावना मोजू शकतात. हे मूल्यांकन एखाद्याच्या विविध वासांना ओळखण्याच्या, निवडण्याच्या किंवा वेगळे करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करतात. जर एखाद्या व्यक्तीने या चाचण्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी गुण मिळवले तर त्याचा अर्थ असा होतो की, त्याला वासाचा विकार आहे, असे डॉक्टर चिराग डी. म्हणाले आहेत. त्यांच्या मते, वास घेण्याची क्षमता कमी असलेल्या व्यक्तींमध्ये वृद्ध, न्यूरोडीजनरेटिव्ह रोग (जसे की अल्झायमर आणि पार्किन्सन्स), सायनसच्या तीव्र समस्या किंवा नाकावाटे श्वास घेण्यास अडथळे येणारे लोक, नुवांशिक परिस्थिती असलेल्या लोकांचा समावेश होतो. धूम्रपान, पर्यावरणातील विषारी पदार्थांचा संपर्क आणि खराब हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी अनेक गोष्टी वास न येणे या कार्यास कारणीभूत ठरू शकतात.

या समस्येवर काम करता येईल का?

डॉक्टर चिराग डी. यांनी सांगितले की, या परिस्थितीत सुधारणा होणे शक्य आहे. मूलभूत आरोग्य समस्यांचे निराकरण करणे, सायनस संसर्गावर उपचार करणे, उदाहरणार्थ, विषारी पदार्थांशी संपर्क कमी करणे किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी तंदुरुस्ती वाढवणे आदी अनेक गोष्टी केल्यास या समस्येचा त्रास कमी होऊ शकतो.

Story img Loader