High Cholesterol Symptoms in Youth: खराब कोलेस्टेरॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे, जो आता सामान्य बनत चालला आहे. पूर्वी ही समस्या मध्यमवयीन लोकांना भेडसावत होती. ज्यामध्ये त्यांना उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा सामना करावा लागला होता, परंतु काही काळापासून ही समस्या तरुणांमध्येही दिसू लागलीये. या समस्येने बरेच तरुण हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि हाय बीपीला बळी पडत आहेत. म्हणूनच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे दीर्घकाळासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घेऊया कोणती आहेत ही लक्षणे…
उच्च कोलेस्ट्रॉलची सामान्य लक्षणे
आपल्या शरीरात अशी काही सामान्य लक्षणे आहेत जी एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी जास्त आहे की नाही ते दाखवतात. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला मळमळ, सुन्नपणा, थकवा, श्वास घेण्यात अडचण, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब इत्यादी लक्षणे जाणवतात. उच्च कोलेस्टेरॉलची मोठी गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच सहसा एखाद्या व्यक्तीला उच्च कोलेस्टेरॉलची स्थिती खूप उशीरा कळते.
अस्वस्थता आणि घाम येणे
उन्हाळ्याच्या हंगामात घाम येणे सामान्य आहे, परंतु सामान्य खोलीच्या तापमानात किंवा हिवाळ्याच्या ऋतूमध्येही जर तुमच्या कपाळाला घाम येत असेल तर ते मोठ्या धोक्याचे लक्षण आहे असे समजून घ्या. वास्तविक, कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे, योग्य प्रमाणात रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही, ज्यामुळे कधीही घाम येणे आणि अस्वस्थता सुरू होते.
(हे ही वाचा: ओव्याचे पाणी प्यायल्याने वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल? पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या)
डोळ्याभोवती पिवळे डाग
जेव्हा कोलेस्टेरॉल खूप वाढते तेव्हा डोळ्यांभोवतीची त्वचा पिवळी पडते किंवा त्यावर पिवळ्या रंगाचे दाणे येतात. हे रक्तातील अतिरीक्त चरबीच्या वाढीमुळे होते, जे खूप धोकादायक आहे.
पायऱ्या चढताना धाप लागणे
२५ ते ३० वर्षे वयोगटातील लोकांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचाली करण्यात फारशी अडचण येऊ नये. पण काही लोक असे असतात की ज्यांना पायऱ्या चढता येत नाहीत, ते चढले तरी त्यांना धाप लागते आणि हृदयाचे ठोके खूप वेगवान होतात. हे उच्च कोलेस्टेरॉलचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
कोलेस्ट्रॉल किती असावे आणि ते वाढले तर कसे समजावे?
जेव्हा शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी निर्धारित पातळीपेक्षा जास्त होते तेव्हा ते मानवी शरीरासाठी धोकादायक बनते आणि अनेक समस्या निर्माण करतात. २०० मिलीग्राम प्रति डेसीलीटर कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी सामान्य श्रेणीमध्ये मानले जाते. एखाद्या पुरुषासाठी चांगले कोलेस्टेरॉल किंवा एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी ४० असावी. तर महिलांसाठी ते ५० असावे. तसेच, खराब कोलेस्ट्रॉल किंवा LDL कोलेस्ट्रॉलची पातळी १०० च्या खाली असावी. त्याच वेळी, सामान्य परिस्थितीत, ट्रायग्लिसराइड्स १४९ mg/dL पेक्षा कमी असावेत.