Zeenat Aman Eye Condition: अभिनेत्री झीनत अमान यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत आपल्याला ptosis नावाच्या डोळ्याच्या आजाराचे निदान झाल्याचे सांगितले आहे. नेमका हा आजार काय आहे. त्याचे निदान कसे झाले, यावर उपचार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील तपशील पूर्ण वाचा.

झीनत अमान यांनी पोस्ट मध्ये काय म्हटले?

“१८ मे २०२३ रोजी मी व्होग इंडियाच्या कव्हरसाठी शूट केले. १९ मे २०२३ ला, मी सकाळी लवकर उठले, एक लहान सुटकेस पॅक करून झहान आणि कारा यांनी मला खार येथील हिंदुजा रुग्णालयात नेले. गेल्या ४० वर्षांपासून मी ptosis या आरोग्य स्थितीसह जगतेय. अनेक दशकांपूर्वी मला झालेल्या दुखापतीमुळे माझ्या उजव्या डोळ्याभोवतीच्या स्नायूंना इजा झाली होती. वर्षानुवर्षे, यामुळे माझी पापणी अधिक आणि अधिक खाली गेली. आणि काही वर्षांपूर्वी हा त्रास इतका वाढला की यामुळे माझी दृष्टी बाधित होऊ लागली.

Handshake and Heart Connection |How a Firm Grip Reveals Cardiovascular
हस्तांदोलनाचा थेट हृदयाशी संबंध! हाताची पकड सांगते हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य कसे आहे?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
health experts advise drummers for relief from permanent pain due to drumming
Pain From Drumming : ढोल-ताशावादनामुळे जडतेय कायमचे दुखणे! आरोग्यतज्ज्ञांचा वादकांना काळजी घेण्याचा सल्ला

जेव्हा कारकिर्दीचा मोठा भाग एखाद्याच्या दिसण्यावर आधारित असतो, तेव्हा अचानक वेगळेच बदल घडवून आणणे कठीण असते. मला हे माहित आहे की या ptosis मुळे माझ्या संधी कमी झाल्या. पण गॉसिप, टिप्पण्या आणि प्रश्न असूनही मला ते कधीच कमीपणाचे वाटले नाही. नेहमीच काही दिग्गज माझ्या पाठीशी उभे होते, त्यांनी माझ्यासह काम करणे पसंत केले, यामुळे नक्कीच मदत झाली.”

या वर्षी एप्रिलमध्ये, एका नेत्ररोग तज्ज्ञाने मला सांगितले की सध्या प्रगत तंत्रज्ञानामुळे पापणी उचलून माझी दृष्टी पुन्हा मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया शक्य आहे. हे ऐकल्यावर आधी मला आश्चर्य वाटलं. काही दिवसांनी आम्ही चाचण्या घेतल्या आणि शेवटी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. त्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये मी घाबरले होतो. माझे हातपाय अक्षरशः सुन्न झाले होते, शरीर थरथरत होते. तेव्हा झहानने मला धीर दिला आणि मला ऑपरेशनसाठी नेले, एक तास शस्त्रक्रिया पार पडली, आता माझा डोळा नीट आहे. मला सांगायला आनंद होत आहे की माझी दृष्टी आता खूप स्पष्ट झाली आहे. माझे कुटुंब, हिंदुजा रुग्णालयातील उत्कृष्ट कर्मचारी आणि विशेषत: हुशार डॉ. सावरी देसाई यांचे आभार”

ptosis म्हणजे काय? कारण व उपचार..

Ptosis, ज्याला सहसा “लटकणारी, सैल पडलेली पापणी” म्हणून ओळखले जाते, ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये वरच्या पापणीची त्वचा ही डोळ्यावर सैल होऊन पडलेली असते. प्राइमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, नेत्रविज्ञान विभागातील डॉ. सौरभ वार्ष्णेय यांनी याविषयी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, जेव्हा पापणी उचलणारे स्नायू किंवा त्यांना नियंत्रित करणाऱ्या नसा कमकुवत होतात किंवा खराब होतात तेव्हा असे घडते.

ptosis शी संबंधित उपचार न केल्‍यास दृष्‍टी कमकुवत होणे, डोळ्‍यावरील ताण वाढणे संभाव्‍य एम्‍ब्लियोपिया असे धोके वाढतात. काही प्रकरणांमध्ये, ptosis हे अन्य वैद्यकीय स्थितीचे किंवा मज्जातंतूच्या विकाराचे लक्षण असू शकते. म्हणूनच मूळ कारणाचे निदान करणे आणि त्यावर उपाय करणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा<< Knee Pain: लालबुंद स्ट्रॉबेरी खाल्ल्याने गुडघेदुखी कशी कमी होते? तज्ज्ञांच्या Video वर डॉक्टर काय म्हणतात वाचा

डॉ वार्ष्णेय यांच्या मते, ही स्थिती एक किंवा दोन्ही डोळ्यांवर परिणाम करू शकते आणि याची तीव्रता वेगवेगळी असू शकते. काही स्थितींमध्ये दृष्टीवर लक्षणीय परिणाम होत नाही तर काही बाबतीत दृष्टी अंशतः किंवा पूर्णपणे कमी होऊ शकते. काहींना Ptosis हा जन्मजात असू शकतो तर काहींना वय, डोळ्यांना झालेला आघात किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यासारख्या विविध कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. नवजात बालकांमध्ये, गंभीर ptosis मुळे उद्भवणारा अपरिवर्तनीय एम्ब्लियोपिया टाळण्यासाठी शस्त्रक्रिया करता येऊ शकते.