Zika virus in Pune : पुण्यातील एक डॉक्टर आणि त्याच्या किशोरवयीन मुलीची झिका विषाणूच्या संसर्गाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.पुण्यात या वर्षात प्रथमच जून महिन्यात झिकाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षी मुंबईत झिकाचे रुग्ण आढळले होते. झिका हा डासांमार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. एडीस इजिप्ती या डासांच्या माध्यमातून झिका विषाणूचा प्रसार होतो आणि हा डास सहसा दिवसा चावतो. एकदा पावसाच्या वातावरणामध्ये त्यांचे प्रजनन वेगाने झाले की, संसर्गाचा धोका वाढतो. गर्भवती महिलांना झिका विषाणूच्या संसर्गचा जास्त धोका असतो. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. जतिन आहुजा यांनी झिका विषाणू म्हणजे नक्की काय, तो कसा परसतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.

Hina khan diagnosed with breast cancer
Hina Khan Cancer: अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Why does a heart attack happen at night
हृदयविकाराचा झटका रात्री का येतो? डॉक्टरांनी केला खुलासा, जाणून घ्या काय काळजी घ्यावी….
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Backwards walking vs jogging benefits
जॉगिंग Vs उलट चालणे; दररोज उलट चालण्याचे कोणते फायदे असतात? लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….
Can rice cause coughing
भात खाल्ल्याने खरंच खोकला होऊ शकतो का? तज्ज्ञांनी सोडवला वाद
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

झिका म्हणजे काय?

झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे. १९४७ मध्ये युगांडाच्या झिका जंगलात तो प्रथम आढळला होता. २०१५ मध्ये अमेरिकेत, विशेषतः ब्राझीलमध्ये लक्षणीय उद्रेक झाल्यानंतर या विषाणूने जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधले. हा सार्वजनिक आरोग्यासाठी धोक्याचा इशारा ठरला. कारण- हा उद्रेक मायक्रोसेफली (Microcephaly) या आजारासह जन्मलेल्या बाळांच्या वाढीशी संबंधित होता. मायक्रोसेफली हा एक गंभीर जन्मदोष आहे; ज्यामध्ये लहान मुलाचे डोके असामान्यपणे लहान असते आणि मेंदू अविकसित असतो. त्यावरून हे सिद्ध झाले, “गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त धोका असतो आणि त्यांच्या बाळावरही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.”

झिका विषाणू पसरविणारे डास घरामध्ये आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी आढळू शकतात. जरी हे डास सहसा दिवसाच्या वेळी चावत असले तरी रात्रीच्या वेळीही ते चावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

हेही वाचा – हृदयविकाराचा झटका रात्री का येतो? डॉक्टरांनी केला खुलासा, जाणून घ्या काय काळजी घ्यावी…..

झिका विषाणू संसर्गाची लक्षणे काय?

झिका विषाणूची लागण झालेल्यांपैकी बहुतांशी म्हणजे सुमारे ८० टक्के लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. काहींना ताप, पुरळ, सांधे व स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला होणारा दाह यांसारखी सौम्य लक्षणे दिसतात. हे संसर्गजन्य डास चावल्यानंतर आठवडाभरात लक्षणे दिसू लागतात आणि ही लक्षणे कित्येक दिवस किंवा एक आठवडाही टिकू शकतात.

झिका विषाणूचा प्रसार कसा होतो?

झिका विषाणू संसर्गित एडिस (विशेषतः एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस) डास चावल्यास मानवाला या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान लैंगिक संबंध, रक्तदान आणि संक्रमित आईपासून तिच्या बाळाला झिका विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. गर्भाशयातच बाळाला झिका विषाणूचासंसर्ग होऊ शकतो.

हेही वाचा – वयाच्या पंचविशीनंतर दुधात पाणी मिसळून का प्यावे? तज्ज्ञांनी केला खुलासा

झिका विषाणूच्या संसर्गामुळे बाळाला धोका होऊ शकतो का?

गर्भधारणेदरम्यान संसर्ग झाल्यास बाळामध्ये मायक्रोसेफली (Microcephaly)सारखे जन्मदोष तसेच इतर न्यूरोलॉजिकल विकार (Neurological Disorders) होऊ शकतात. त्यापैकी काहींची लक्षणे मूल मोठे झाल्यावर दिसू शकतात. त्यामुळे गर्भवती आईला तिच्या पहिल्या तिमाहीत अल्ट्रासाऊंड तपासणीबाबत सतर्क राहावे लागते.

झिका विषाणूच्या तपासणीसाठी कोणती चाचणी केली जाते?

झिका विषाणूच्या तपासणीसाठी रक्त किंवा लघवीच्या RT-PCR चाचणी केली जाते. व्यक्ती आजारी पडल्यानंतर ही चाचणी एक आठवड्याच्या आत केली, तर अचूक निदान करण्यास मदत होते. जर आजारी पडल्याच्या एका आठवड्यानंतर झिका विषाणूची तपासणी केली, तर ही चाचणी पद्धत फार प्रभावी ठरू शकत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

झिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डास चावणे टाळणे. त्यामध्ये मॉस्किटो रिपेलेंट्स (Mosquito Repellents) वापरणे, लांब बाह्यांचे कपडे वापरणे, घराच्या परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे आणि वातानुकूलित वातावरणात किंवा डास प्रवेश करू शकणार नाहीत अशा ठिकाणी राहणे आदी गोष्टींचा समावेश होतो. गर्भवती स्त्रिया किंवा गर्भवती होण्याची योजना आखत असलेल्या स्त्रियांना सक्रिय झिका संक्रमित भागातून प्रवास न करण्याचा सल्ला दिला जातो. सुरक्षित संभोग (कंडोम वापरून) केल्याने विषाणूचे लैंगिक संक्रमण टाळता येते. रक्तदानाद्वारे संभवणारा संक्रमणाचा धोका रक्त तपासणी आणि चाचणीद्वारे कमी करता येतो.

झिका विषाणूसंसर्गावर उपचार कसा केला जातो?

झिका विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही आणि डॉक्टरांना रुग्णांवर लक्षणांनुसार उपचार करावे लागतात. वेदना कमी करण्यासाठी आणि तापासाठी पॅरासिटामॉल औषध दिले जाते. रुग्णांना भरपूर विश्रांती घेण्याचा आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ज्या गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण झाली असेल, त्यांच्या बाळाला जन्मदोष संभवतो का हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना रुग्णांचे निरीक्षण करणे आवश्यक असते