Christmas 2021 Special Cupcakes : वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. या महिन्यात नाताळ सण साजरा केला जातो. लवकरच ख्रिसमस साजरा केला जाईल. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. केक कापून ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं. ख्रिसमसचं रम प्रकरण प्रसिद्ध आहे. पण आता या निमित्ताने लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीच्या अनेक फ्लेवर्सच्या केकचा समावेश करण्यात आला आहे. करोनाचा काळ सुरू आहे, त्यामुळे बहुतेक लोक घरी केक बनवतील. बहुतेक लोक बाजारातून चॉकलेट केक आणतात किंवा घरी बनवतात. तुम्हीही या ख्रिसमसमध्ये घरी केक बनवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या सोप्या रेसिपीसह टेस्टी व्हॅनिला कप केक बनवू शकता. जे चॉकलेट केक खात नाहीत त्यांच्यासाठी व्हॅनिला कप केक हा उत्तम पर्याय आहे. व्हॅनिला कप केक स्वादिष्ट आणि बनवायला सोपं आहे. जाणून घ्या व्हॅनिला कप केकची पाककृती आहे.
व्हॅनिला कप केक बनवण्यासाठी साहित्य :
दोन वाट्या मैदा,
एक कप व्हाइट शुगर,
बेकिंग पावडर,
व्हॅनिला एक्सट्रॅक्ट,
मीठ,
३ अंडी,
दूध आणि तेल.
व्हॅनिला कप केक बनवण्याची कृती :
- स्टेप 1- व्हॅनिला कप केप बनवण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये मैदा, साखर, बेकिंग पावडर, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट आणि मीठ एकत्र करा आणि चांगले मिसळा.
- स्टेप 2- आता या केकच्या बॅटरमध्ये अंडी, दूध आणि तेल घाला आणि मिक्स करा.
- स्टेप 3- तोपर्यंत ओव्हन ३५० डिग्रीवर प्रीहीट करा. केक टिन देखील ग्रीस करा.
- स्टेप 4- केकच्या बॅटरला ग्रीस करत केक टिनमध्ये ठेवा आणि प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये शिजवा.
- स्टेप 5- केक बनल्यानंतर तो बाहेर काढा आणि थंड करा.
- स्टेप 6-आता एका पाइपिंग बॅगमध्ये व्हॅनिला एसेन्स क्रीम घाला आणि कप केक टॉपिंग करा.
- स्टेप 7- तुमचा ख्रिसमस स्पेशल कप केक तयार आहे.