योग्य आहार घेतल्याने आपण तृप्त होतोच शिवाय त्यातुन आपल्या शरीरालाही आवश्यक प्रथिने आणि जीवनसत्व मिळतात. परंतु आपण जर चुकीच्या पद्धतीचा आहार घेतला तर त्याचा आपणाला त्रास होऊ शकतो. कारण, आयुर्वेदाने प्रत्येक अन्नाची विशिष्ट रचना, दर्जा, अंतर्गत तापमान अशा विशिष्ट क्रियांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थांचे मिश्रण केलेलं योग्य आणि कोणत्या पदार्थांचे मिश्रण अयोग्य याबाबतची माहिती आयुर्वेदिक तज्ञांनी दिली आहे ती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुर्वेदतज्ञ डॉक्टर रेखा राधामोनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिली आहे. त्या म्हणतात, “अनेक पॅरामीटर ठरवतात की, अन्न पचन्यासाठी योग्य आहे की नाही, ते पौष्टिक आहे की नाही आणि ते शरीर वाढण्यास मदत करते की उलट कृती करतात.” शिवाय डॉ. रेखा यांनी काही सामान्य अन्न मिश्रणाची यादी तयार केली आहे, जे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की “तुम्हाला पचनक्रिया सुधारायची असेल आणि अन्नातील विषारीपणा कमी करायचा असेल तर अयोग्य अन्नपदार्थांच्या मिश्रणाचे सेवन टाळायला हवे”

हेही वाचा- किडनी निकामी करू शकतात ‘ही’ ५ फळे; फ्रुक्टोजमुळे युरिक ऍसिड वाढून शरीरच देतं गंभीर संकेत

अन्न पदार्थाचे अयोग्य मिश्रण –

  • केळीव्यतिरिक्त ताजी फळे आणि दुध
  • गरम अन्नात थंड अन्न मिसळून खाणं
  • फळांसोबत पनीर
  • गहू आणि तीळ तेल
  • दही आणि चिकन
  • अल्कोहोल, मध आणि दही/दह्यानंतर लगेच गरम पेय घेणं
  • दूध आणि गूळ

हेह वाचा – जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीज होत नाही? यामागील सत्य काय ते तज्ञांकडून जाणून घ्या

आयुर्वेद तज्ञ डॉक्टर अंशू वात्स्यान यांनी indianexpress ला दिलेल्या माहितीनुसार, आयुर्वेद हे अन्न मिश्रण सुसंगत आणि विसंगत असे वर्गीकृत करतो. त्यांनी सांगितलं की, विशेषतः लिंबूवर्गीय फळे ज्यामध्ये स्ट्रॉबेरी, द्राक्षे, संत्री, आवळा यांचा समावेश असतो अशी फळे दूध किंवा दह्यासोबत घेऊ नये. कारण या मिश्रणामुळे जठराची सूज आणि आतड्यांसंबंधीत समस्या उद्भवू शकतात. तसंच दुधासह मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं आणि रात्री दही खाणे टाळावे, असंही डॉ. वात्स्यान यांनी सांगितले. तर डॉ. रुची सोनी, पोषण आणि आहारतज्ञ, टोनऑप यांनी सांगितलं की, “असे अनेक अन्न पदार्थांची मिश्रण आहेत. ज्याचा आपण उपभोग घेतो पण त्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते.”

हेही वाचा- लहान मुलांसाठी किडनीची सूज बनू शकते मोठी समस्या, ‘ही’ लक्षणे दिसताच करा उपचार

चहा हळद –

जसं की, चहामध्ये हळद मिसळणे किंवा चहासोबत हळदीच्या पदार्थांचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, तर चहामध्ये टॅनिन असते आणि दोन्ही मिळून आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकते. केळीचा शेक अनेकांना आवडतो, पण आयुर्वेदानुसार केळी आणि दूध एकत्र करणे वाईट आहे आणि याचा तुमच्या पचक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

पालक पनीर –

आपल्या सर्वांनाच पालक पनीर खायला आवडतं, पण पालक आणि पनीर हे हेल्दी कॉम्बिनेशन नाही. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते आणि पनीरमध्ये कॅल्शियम असते. त्यामुळे जेव्हा हे दोन पदार्थ एकत्र खाल्ले जातात तेव्हा कॅल्शियम लोह पोषक द्रव्यांचे शोषण रोखते. फळे खूप लवकर शोषली जातात, पोटातून जातात आणि नंतर आतड्यांमध्ये शोषली जातात. जेव्हा या फळांमध्ये तृणधान्ये, मांस किंवा वाळलेल्या पदार्थांमध्ये मिसळली जातात, त्यामुळे ते जास्त काळ पचनसंस्थेत राहतात. त्यामुळे तुमच्या आतड्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मासे आणि दूध –

मासे आणि दूध एकत्र करुन खाऊ नये. कारण, दोन्ही प्रथिने अन्नात अतिशय काळजीपूर्वक मिसळली पाहिजेत. दूध आणि मासे दोन्हीमध्ये प्रथिने आहेत आणि या दोघांच्या मिश्रणामुळे शरीरात न पचलेले अन्नकण तयार होऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy lifestyle tips learn why you should avoid these common food combinations jap
Show comments