रात्रीच्या आरामदायी झोपेसाठी अनेकजण डोक्याखाली उशीचा वापर करतात. उशीचा वापर अगदी ठीक आहे पण त्याचे कव्हर नियमितपणे बदलले नाही तर अनेक आजारांचा धोका वाढतो. तुमच्यापैकी अनेकजण रात्री केस तेलकट असतानाही डोक्याखाली उशी घेतो. तर अनेकांना रात्री झोपेत तोंडातून लाळ गळण्याची समस्या असते, ही लाळ अनेकदा उशीवर पडते, यात मानाचे घाम उशांना लागतो, यामुळे उशीच्या कव्हरमधून खूप कुबट, उग्र वास येतो, असे असतानाही बहुतेकजण महिनोंमहिने कव्हर न बदलता त्याच उशा वापरतात. अशाने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणून उशीचे कव्हर किती दिवसांनी बदलले पाहिजे जाणून घेऊ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका नवीन संशोधनातून असे आढळून आले आहे की, टॉयलेट सीटच्या तुलनेत उशीच्या कव्हरमध्ये १७ हजार पट जास्त बॅक्टेरियांची वाढ होत असते. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केला आहे. उशीच्या कव्हरच्या स्वॅब टेस्टमध्ये डेड स्किन सेल्स, घाम, आणि मोठ्याप्रमाणात लाळेतील जंतू आढळून आले. यावेळी अभ्यासादरम्यान न धुतलेल्या उशीचे नमुने गोळे केले गेले आणि सात दिवस ते तसेच ठेवले गेले. ज्यात मोठ्याप्रमाणात बॅक्टेरिया आढळून आले, ज्यामुळे त्वचेचे संक्रमण होऊ शकते.

अभ्यासानुसार, एक व्यक्ती दर २४ दिवसांनी वापर असलेल्या उशीचे कव्हर बदलते. यावर त्वचारोगतज्ज्ञ डॉ. हॅडली किंग म्हणाले की, जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा डेड स्किन सेल्स, घाम आणि धूळीचे कण उशीच्या कव्हरवर जमा होतात. ज्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. यामुळे उशीचे कव्हर दर आठवड्याने बदलणे गरजेचे आहे.

कॉर्टनपेक्षा सिल्कचे उशी कव्हर चांगले

उशीचे कव्हर सिल्कचे असेल तर त्यात बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता कमी होते आणि त्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यताही कमी होते. यावरील अभ्यासात असे आढळून आले की, त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी उशीचे कॉटर्न कव्हरपेक्षा सिल्कचे कव्हर चांगले असते. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचा धोका कमी होतो.

त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी करा ‘हे’ बदल

त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी काही गोष्टींमध्ये नियमित बदल करणे गरजेचे आहे. यामध्ये उशीच्या कव्हरासह बेडशीट, मेकअप ब्रश, ब्युटी ब्लेंडर आणि टॉवेल या गोष्टी काही दिवसांनी स्वच्छ करणे गरजेच्या आहे. तसेच या गोष्टी वेळोवेळी बदलल्या पाहिजेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy lifestyle tips pillow covers are more dirtier than toilet seat known in how many days cover should be changed sjr