Avoid Eating These Foods with Eggs: ‘संडे असो वा मंडे रोज खा अंडे’ ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आहोत. कारण एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. मात्र, जिथे भरपूर फायदा असतो तिथे नुकसानही होण्याचा धोका आपल्याला नाकारता येत नाही. अंडी शरीरासाठी फायदेशीर तेव्हाच होईल जेव्हा त्याचं योग्य पध्दतीने सेवन केल्या जाईल. म्हणूनच अंडी खातांना ‘या’ चूका अजिबात करू नका, अन्यथा त्याच्या दुष्परिणामाला आपल्याला समोर जावं लागेल. जाणून घ्या ही महत्वाची माहिती.

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात कोणते व्हिटामिन आढळते?

आजकाल जगभरातील डॉक्टर लोकांना आहारात अंड्यांचा समावेश करण्यास सांगतात. त्यासाठी, रोज एक किंवा दोन अंडी खाणे अगदी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शिअम आणि झिंक यांचा समावेश असतो. यासोबतच एका अंड्यामधून ७७ कॅलरीज, ६ ग्रॅम प्रथिने आणि ५ ग्रॅम फॅट्स मिळतात. या सर्व पोषकतत्वांमुळेच अंड्याला पौष्टिक आहार असे म्हटले जाते. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला आवश्यक असलेली प्रत्येक पोषक गोष्ट अंड्यामध्ये असते. पण तुम्हाला माहिती आहे का, अंड्यांसोबत पाच पदार्थ खाणं हे विषसमान ठरु शकते.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Mushrooms benefits Eating 5 Mushrooms Daily May Help Combat Heart Disease And Dementia
दररोज ५ मशरूम खाल्ल्याने शरिरावर काय परिणाम होतात; फायदे ऐकून लगेच आहारात समावेश कराल
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…

अंड्यांसोबत ‘हे’ ५ पदार्थ खाऊ नये

अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. प्रथिनेयुक्त अंडी केवळ आपले स्नायू मजबूत करत नाहीत तर हृदयाच्या कार्यास देखील मदत करतात. अंडी, पौष्टिकतेचे पॉवरहाऊस, नाश्त्यात खाण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता किंवा त्यापासून आमलेट बनवू शकता. तथापि, काही गोष्टींसोबत अंडी एकत्र करणे शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते. चला तर जाणून घेऊया सविस्तरपणे.

(हे ही वाचा : १०० ग्रॅम मखाण्यामध्ये किती पौष्टिकता असते? दररोज मुठभर खाणे चांगले? आहारतज्ज्ञ सांगतात की…)

१. सोया मिल्क आणि अंडी एकत्र खाऊ नये

जिममध्ये जाणारे बरेच लोक अंड्यासोबत सोया मिल्कचे सेवन करतात. सोया मिल्कसोबत अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील प्रथिनांच्या शोषण प्रक्रियेत अडथळा येतो.

२. भाजलेले मांस आणि अंडी शरिरासाठी घातक

अनेक ठिकाणी अंडी आणि बेकन यांचे मिश्रण म्हणजे भाजलेले मांस खाल्ले जाते. त्यात भरपूर प्रथिने आणि चरबी असल्याने, या मिश्रणामुळे तुम्हाला सुस्ती येऊ शकते. अंडी जे तुम्हाला झटपट ऊर्जा देतात, खारवून वाळवलेले डुकराचे मांस सह एकत्रितपणे तुम्हाला आळशी बनवू शकतात. त्यामुळे आपण सेवन करणे टाळावे.

३. चहा आणि अंडे धोकादायक

जगभरात अनेक ठिकाणी अंडे चहासोबत खाल्ले जाते. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल की चहासोबत अंडी मिसळल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात तुमच्या आरोग्याला आणखी हानी पोहोचू शकते.

४. दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी

दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी हे देखिल शरिरासाठी हानिकारक ठरू शकतात. खरबुजासोबत अंडी कधीही खाऊ नका. याशिवाय बीन्स, चीज, दूध किंवा त्यापासून बनवलेल्या दुग्धजन्य पदार्थांसोबत अंडी खाणे टाळावे.

५. साखर आणि अंड्यांचं द्रावण ठरेल विषारी

जर तुम्ही साखरेसोबत अंडी वापरण्याचा विचार करत असाल तर त्याचे दुष्परिणाम देखील जाणून घ्या. खरं तर, जेव्हा या दोन गोष्टी एकत्र शिजवल्या जातात तेव्हा त्यामधून बाहेर पडणारे अमीनो अॅसिड शरीरासाठी विषारी बनतात, ज्यामुळे रक्त गोठण्याची समस्या वाढू शकते.

वरिल पदार्थांचे एकत्र सेवन करने टाळले तर त्यापासून शरिराला कुठलीही हाणी होणार नाही. आपल्याला वरिल पदार्थचे एकत्रीतपणे सेवन करायचे असेल तर एकदा आपण तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Story img Loader