South Korea Halloween Party Cardiac Arrest: दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथे हॅलोविन निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन तब्बल १५० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हॅलोविन पार्टीचा आनंद लुटत असतानाच अचानक गर्दीत धावपळ सुरु झाली व काहीच क्षणात अनेक जण एकमेकांना आदळून चेंगराचेंगरी वाढू लागली. प्राप्त माहितीनुसार या गर्दीत ५० जणांना घाबरून हृदयविकाराचा झटका आला होता ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्यही अनेकजण या दुर्दैवी घटनेत जखमी झाले आहे. या घटनेनंतर हृदयाच्या देखभालीसंदर्भात अनेकांना प्रश्न पडू लागले आहेत. यातीलच एक मुख्य प्रश्न म्हणजे हार्ट अटॅक ओळखायचा कसा? आजच्या या लेखात आपण शरीर आपल्याला हृदय विकाराच्या आधी देणारे काही संकेत जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा हृदय विकाराचा झटका फार तीव्र नसल्यास समजून येत नाही, छातीत दुखतंय असं म्हणून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात पण असे करणे भविष्यात धोकादायक ठरू शकते. हृदयविकाराचा झटका येत असल्याचा सर्वात मोठा संकेत म्हणजे खूप घाम येणे. हार्टअटॅक येण्याआधी शरीरातील काही अववयवांना नेहमीपेक्षा खूप जास्त घाम फुटतो. आता हा घाम हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण आहे की फक्त काम केल्याने किंवा उन्हात फिरल्याने, पंखा बंद असल्याने येत आहे हे ओळखायचं कसं जाणून घेऊयात..

हार्ट अटॅक येत असल्याचे कसे ओळखाल?

हृदय विकाराचा झटका येण्याआधी काही लक्षणे दिसून येतात. रात्री नीट झोप न लागणे, झोपताना सतत जाग येणे, ताप, ही लक्षणे असल्यास आपल्याला त्वरित हृदय विकाराचा झटका येणारच असे नाही. मात्र तुम्ही एकदा वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे यासाठी शरीर आपल्याला संकेत देत असते.

हार्ट अटॅक येत असल्यास या अवयवांना येतो खूप घाम…

द हेल्थ साईटच्या माहितीनुसार, व्यायाम केल्यावर, उन्हात फिरल्यावर तुम्हाला येणारा घाम हा मर्यदित असतो मात्र हार्टअटॅकच्या वेळी येणारा घाम हा तुलनेने जास्त असतो. तसेच शरीरात अन्यही बदल दिसून येत असतात जसे की, अस्वस्थ वाटणे, दम लागणे, थकवा जाणवणे, छाती जड होणे इत्यादी. हार्टअटॅकच्या वेळी येणारा घाम हा मुख्यतः मान, गळा व चेहऱ्यावर ओठांच्या अवतीभोवती येऊ लागतो. कपाळावरही खूप घाम येणे हे हृदयाच्या विकाराचे लक्षण असू शकते.

बुरशीच्या संसर्गाचं मोठं संकट! WHO ने जाहीर केली १९ संसर्गांची यादी, जाणून घ्या सर्वाधिक धोका कोणाला?

हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?

प्रत्येकाच्या शरीराच्या क्षमतेनुसार अनेक उपाय सुचवले जाऊ शकतात, यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे सर्वात उचित ठरेल. मात्र काही साधे सोपे जीवनशैलीचे बदलही तुम्हाला हुरुदयविकाराच्या धोक्यापासून वाचवू शकतात. वेळच्या वेळी जेवण, शतपावली, कमी तेलकट जेवण, साधा व्यायाम किंवा निदान चालणेही तुमचे हृद सुदृढ ठेवण्यात मदत करते.

विश्लेषण: Dove, TRESemmé च्या शॅम्पूने कॅन्सरचा धोका? Unilever का परत मागवत आहे उत्पादने?

(टीप: वरील लक्षणे दिसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही मात्र अशावेळी कृपया वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart attack early signs these body parts gets really sweaty south korea halloween party cardiac arrest svs