Bad Cholesterol Heart Attack Risk: कोविडच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेकदा अनेक तज्ज्ञांनी आहारात हळदीचा समावेश करून घेण्याचा सल्ला दिला होता. गेल्या काही वर्षात समोर आलेल्या माहितीनुसार, हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हळदीतील ४ ते १० टक्के भाग असलेल्या कर्क्युमिन नावाच्या बायोएक्टिव्ह कंपाऊंडच्या उपस्थितीमुळे शरीराला डीजनरेटिव्ह सिंड्रोमपासून सुरक्षा मिळण्यास मदत होऊ शकते.

आपल्या सर्वांना माहित आहे की, अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील दीर्घकालीन सेल्युलर नुकसान टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कर्क्युमिन रॅडिकल्सची संख्या कमी करते जेणेकरून फॅटी ऍसिड, प्रथिने आणि अगदी डीएनए सारख्या महत्त्वपूर्ण घटकांवर परिणाम होण्यापासून थांबवता येऊ शकते.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा? (फोटो सौजन्य @Freepik)
Heart Attack Exercise : हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दररोज किती तास व्‍यायाम करावा?
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात

हळदीतील कर्क्यूमिनमुळे रक्तवाहिन्यांच्या पडद्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे रक्तदाबाचे नियमन सुद्धा होऊ शकते. रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून थांबवणे व परिणामी हृदयाला व महत्त्वाच्या अवयवांना होणारा रक्ताचा पुरठा सुरळीत ठेवणे हे करक्युमिनचे आश्चर्यकारक फायदे ठरू शकतात.

यासंदर्भात झालेल्या एका अभ्यासात १२१ कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी झालेल्या व्यक्तींविषयी निरीक्षण नोंदवण्यात आले होते. ज्यात असे दिसून आले की. शस्त्रक्रियेच्या काही दिवस आधी आणि नंतर, ज्या गटाने दिवसाला ४ ग्रॅम कर्क्युमिन घेतले त्यांना हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ६५ टक्क्यांनी कमी झाला. याशिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवून हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत होऊ शकते. याविषयी प्राण्यांवर झालेल्या एका अभ्यासात दिसून आले की, हळदीच्या अर्काने कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून आणि रक्तवाहिन्यांमध्ये एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉल तयार होण्यापासून रोखले जाऊ शकते.

हळदीचा मधुमेहावर परिणाम (Turmeric Effect On Diabetes)

मधुमेहाच्या स्थितीमुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो हे लक्षात घेता, अभ्यासातून असे दिसून आले आहे की कर्क्यूमिन ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि दाहक प्रक्रिया कमी करताना मधुमेहावर सुद्धा प्रभावी ठरू शकते. याशिवाय रक्तातील ग्लुकोज, ग्लायकेटेड हिमोग्लोबिन आणि बॉडी मास इंडेक्स लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे सुद्धा अभ्यासात आढळून आले. आधीच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की प्रीडायबेटिस असलेल्या लोकांना, ज्यांनी नऊ महिने कर्क्यूमिन घेतले होते, त्यांना प्लेसबो घेत असलेल्या लोकांपेक्षा टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता कमी झाली होती. क्युरक्यूमिन स्वादुपिंडात इन्सुलिन बनवणाऱ्या बीटा पेशींचे कार्य सुधारण्यासाठी दिसले, असेही लेखकांनी नमूद केले.

तुमच्या शरीराला कर्क्युमिनची किती गरज आहे? (How Much Turmeric Your Body Needs)

कच्ची हळद पाण्यात उकळणे ही एक सामान्य चूक आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही त्यात ठेचून मिरपूड घालत नाही तोपर्यंत हळदीत असलेले कर्क्यूमिन मोकळे होणार नाही. याशिवाय, हळदीच्या मुळामध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण आणि पात्रता निश्चित करणे खूप कठीण आहे,म्हणूनच अपुऱ्या आहारातील सेवनाला पूरक म्हणून, नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा कर्क्यूमिनच्या अर्काचा डोस घेणे अधिक चांगले आहे. कच्च्या हळदीचा तुकडा, (3 ग्रॅम ते 5 ग्रॅम वजनाचा) तुकडा तुम्हाला २०० मिलीग्राम ते ५०० मिलीग्राम कर्क्यूमिन देऊ शकतो. यानुसार दररोज आपण ५०० -२००० मिलीग्राम हळदीचे सेवन करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा<< खराब कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यासाठी दिवसाला किती बदाम खावे? डॉक्टरांनी सांगितले, “प्रत्येक जेवणाआधी…”

अतिहळदीचे सेवन कोणी करू नये? (Who Should Avoid Turmeric)

हळदीच्या अतिसेवनाने रक्त पातळ होण्याचा धोका असू शकतो तसेच यकृत किंवा पित्तनलिकेच्या समस्या असलेल्या लोकांनी हळदयुक्त आहार घेऊ नये कारण यामुळे पित्ताचे प्रमाण वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही हळदीचे सेवन वाढवण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.

Story img Loader