एका नवीन परीक्षणानुसार भीती निर्माण करणा-या घटनांना मेंदू जी प्रतिक्रिया देतो त्याचा प्रभाव हृदयावर पडू शकतो. ब्रिटेन येथील ब्राइटन अॅण्ड ससेक्स मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी हृदयाच्या ठोक्यांचे चक्र आणि भीतीची जाणीव या दरम्यानचा दुवा शोधून काढला आहे.
निरोगी स्वयंसेवकांवर करण्यात आलेल्या परीक्षणानुसार, जेव्हा त्यांच्या हृदयाचे आकुंचन आणि शरिरात रक्तप्रवाह चालू असताना त्यांच्यामध्ये भयाची जाणीव निर्माण होण्याची शक्यता जास्त होती. तुलनेत, हृदयाचे ठोके जेव्हा संथगतीने होत होते तेव्हा याची शक्यता कमी दिसली. हृदयाचे आकुंचन होत असताना किंवा चित्त शांत असताना एखादे भयानक चित्र पाहिले तर आपण लगेच दचकतो आणि त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. तेच भयानक चित्र जर हृदयाचे प्रसरण होताना पाहिले तर भीती वाटत नाही.

Story img Loader