मार्च महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्रासह देशभरात तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तसेच पुढील काही आठवडे असेल कडक ऊन पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उष्णता वाढल्याने आरोग्याविषयी समस्या देखील वाढू लागतात. अशा परिस्थितीत उष्णतेपासून सुरक्षित राहण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक अॅडव्हायजरी जाहीर केली आहे. या अॅडव्हायजरी अंतर्गत आरोग्य मंत्रालयाने तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी काही महत्वाच्या मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी जाणून घ्या उपाययोजना…
शरीर हायड्रेटेड ठेवा.
पाण्याअभावी उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे अनेक जण विविध आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला उष्णतेपासून वाचवायचे असेल, तर स्वतःला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. याशिवाय लिंबू पाणी, लस्सी यांसारखी पेये प्या. गरज पडल्यास ORS घ्या.
उन्हात जाणं टाळा.
उन्हाळ्यात होणार्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उच्च प्रथिनेयुक्त अन्न खाणे टाळणे आवश्यक आहे. तसेच गरज नसल्यास दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत उन्हात बाहेर पडू नये. यासह पातळ, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घाला.
चहा, कॉफीचं सेवन टाळा.
उष्मघातापासून वाचण्यासाठी अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा जास्त साखर असलेली पेये टाळा. याशिवाय उच्च प्रथिनेयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळावे.
मसालेदार अन्न खाणे टाळा.
उन्हाळ्यात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मसालेदार अन्न खाणे टाळा. त्याऐवजी हंगामी फळ भाज्या, पालेभाज्या किंवा ताजी फळे आणि फळाच्या रसाचे सेवन करा, यासोबत दरवाजे आणि खिडक्याचे तोंड दरवाजाच्या दिशेने असल्यास त्या दिवसा बंद ठेवाव्यात आणि रात्री उघडा जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल.
मांसाहारापासून दूर रहा.
उन्हाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी मांसाहार कमी करा. कारण उन्हाळ्यात मांसाहार पचण्यास बराच वेळ लागतो, ज्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. अन्न पचण्यास उशीर झाल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते.