आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन जर्मनीची दिग्गज कारनिर्माती कंपनी BMW आपल्या सीरिज-3 गाड्यांवर बंपर डिस्काउंट देत आहे. त्यामुळे जर तुम्ही BMW कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एकदम योग्य वेळ आहे. कारण, कंपनीकडून आपल्या स्पोर्टी सिडान कारच्या प्रेस्टीज व्हेरिअंटवर 7.30 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. तर लग्जरी व्हेरिअंटवर 8.30 लाख रुपयांचं डिस्काउंट मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय असेल किंमत –
BMW प्रेस्टीज व्हेरिअंटची किंमत 39.80 लाख रुपये आहे, तर लग्जरी व्हेरिअंटची किंमत 45.30 लाख रुपये आहे. पण, डिस्काउंटमुळे प्रेस्टीज व्हेरिअंट जवळपास 32 लाख रुपयांपर्यंत खरेदी करता येईल, आणि लग्जरी व्हेरिअंटवर 8.30 लाखांची सूट मिळाल्यामुळे ही कार 37 लाखांपर्यंत खरेदी करता येणार आहे.

डिस्काउंटमागे नेमकं कारण काय? –
कंपनीकडून BMW- 3 series या एंट्री लेवलच्या गाड्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात सूट देण्याचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे. लवकरच कंपनी नेक्स्ट जनरेशन 3 सीरिजच्या गाड्या लॉन्च करणार आहे. कंपनी ‘2018 पॅरिस मोटार शो’मध्ये नेक्स्ट जनरेशन 3 सीरिजच्या गाड्या सादर करणार आहे. त्यामुळे नव्या गाड्या बाजारात येण्यापूर्वी जुन्या गाड्याची जास्तीत जास्त विक्री करण्याचं कंपनीचं उद्दीष्ट आहे, त्यामुळेच कंपनीकडून इतक्या मोठ्या प्रमाणात सूट दिली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy discount offer from bmw on the 3 series
Show comments