तुम्हीही या वर्षी उत्तराखंडमधील केदारनाथला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ६ मे पासून केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत. यासाठी प्रवाशांना केदारनाथ धामला पूर्ण सहजतेने पोहोचता यावे यासाठी सरकारने हेलिकॉप्टरचे बुकिंगही सुरू केले आहे. गुप्तकाशी, सिरसी आणि फाटा येथून केदारनाथ धामपर्यंत तुम्ही हेलिकॉप्टर सेवा बुक करू शकता. केदारनाथ धामपर्यंत जाण्यासाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन बुक करू शकता. यासाठी तुम्हाला उत्तराखंड सरकारच्या heliservices.uk.gov.in या वेबसाइटला भेट देऊन बुकिंग करावे लागेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने यंदाही हेलिकॉप्टर सेवेच्या भाड्यात वाढ केलेली नाही. २०२० मध्ये निश्चित केलेले भाडे यावेळी लागू करण्यात आले आहे. एकूण ९ हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपन्या प्रवाशांना सुविधा देणार आहेत. गुप्तकाशी ते केदारनाथ ७,७५० रुपये, फाटा ते केदारनाथ ४,७२० रुपये, तर सिरसी ते केदारनाथ तुम्हाला ४,६८० रुपये मोजावे लागतील.
कशी कराल नोंदणी
प्रथम तुम्हाला heliservices.uk.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला नोंदणीवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल, आधार कार्ड क्रमांक आणि ईमेल आयडी भरावा लागेल. त्यानंतर पासवर्ड टाकाल्यानंतर तुमची नोंदणी होईल. प्रवासाची तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्हाला युजर्स लॉगिनवर जावे लागेल. त्यानंतर यूजर आयडीवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि नोंदणी दरम्यान तयार केलेला पासवर्ड प्रविष्ट करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्यानंतर तुम्हाला जिथून हेलिकॉप्टर सेवा घ्यायची आहे ते ठिकाण निवडा, नंतर देय रक्कम भरल्यानंतर तुमची हेली सेवा बुक केली जाईल.
IRCTC: चार धाम यात्रेसाठी ११ रात्री १२ दिवसांचे पॅकेज, जाणून घ्या किती खर्च येईल
चार धाम यात्रेबाबत प्रवासाच्या सर्व मार्गांवर एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करावी. प्रवासाच्या मार्गावर योग्य अंतरावर वॉटर एटीएम बसवावेत. हॉटेल्सवर दर यादी तयार करावी आणि भेसळीवरही लक्ष द्यावे आणि चार धाम यात्रेकरूंच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी करावा, अशा सूचना मुख्यमंत्री धामी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.