आपण अनेकदा शरीराच्या सर्व भागांच्या सौंदर्याची काळजी घेतो, परंतु दात पिवळे पडण्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. दातांमध्ये पिवळेपणा असल्यास अनेकवेळा लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. जरी आपण दररोज ब्रशने स्वच्छ करतो, परंतु तरीही अनेकदा आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. आज आपण असे ५ घरगुती उपाय जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज चमकदार तर होतीलच, पण डेंटल क्लिनिकचा खर्चही वाचेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी ५ घरगुती उपाय :

आले :

आल्याचे छोटे तुकडे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करा आणि नंतर त्यात पाव चमचा मीठ मिसळा. त्यात लिंबाचा रसही मिसळा. तिन्ही गोष्टींचे मिश्रण टूथब्रशने दातांवर घासा.

Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीने करा बर्फाचा वापर; होतील अनेक फायदे

कडुलिंबाची पाने :

कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहीत आहेत. कडुलिंबाची पाने एका भांड्यात घेऊन ती गरम पाण्यात उकळवा, नंतर हे पाणी फिल्टर करून थंड होऊ द्या. आता या पाण्याने गुळण्या करा. कडुलिंबाच्या काडवाटपणामुळे तोंड आणि दातांमध्ये असलेले जंतू नष्ट होतात.

एप्सम मीठ :

एप्सम सॉल्टला मॅग्नेशियम सल्फेट देखील म्हणतात. हे मीठ आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. हे मिश्रण टूथब्रशने दातांवर घासून नंतर तोंड धुवा.

कोको पावडर :

कोको पावडर पाण्यात किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट ब्रशवर लावून दात स्वच्छ करा. या मिश्रणाच्या वापराने दातांची चमक पुन्हा येईल.

National Banana Day 2022 : राष्ट्रीय केळी दिनानिमित्त जाणून घेऊया केळ्यांविषयी काही रंजक तथ्ये

पुदिन्याची पाने :

पुदिना खूप गुणकारी मानला जातो. पुदिन्याची ३ ते ४ पाने बारीक करून खोबरेल तेलात मिसळा. हे मिश्रण टूथब्रशवर लावा आणि दातांना चोळा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here are 5 home remedies to get rid of yellow teeth pvp