National Banana Day 2022 : आज २० एप्रिल म्हणजेच राष्ट्रीय केळी दिवस आहे. प्रत्येक वार्षिक एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी हा दिवस साजरा केला जातो. केळी हे जगातील सर्वात जुने फळ मानले जाते. हे फळ जगभरातील बहुतांश देशांमध्ये आढळते. मात्र त्याचे प्रकार सर्वत्र भिन्न आहे. केळीचा उगम आग्नेय आशिया म्हणजे मलेशिया, इंडोनेशिया किंवा फिलीपिन्सच्या जंगलात झाला असे मानले जाते. आजही, या देशांमध्ये अनेक प्रकारची जंगली केळी उगवतात, त्यापैकी अनेक अतिशय चवदार असतात. केळ्याला इंग्रजीत ‘बनाना’ हे नाव देण्याचे श्रेय आफ्रिकन लोकांना दिले जाते. त्याचवेळी हिंदीतील ‘केला’ हा शब्द ‘फिंगर’ या अरबी शब्दावरून आला आहे असे मानले जाते.

जगभरात केळीच्या १००० पेक्षा जास्त जाती उगवल्या जातात. या जाती ५० गटांमध्ये विभागल्या जाऊ शकतात. यापैकी बऱ्याच जाती खूप गोड आहेत. जसे की कॅव्हेंडिश प्रकार, जी सर्वात सामान्य आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाणारी प्रजात आहे. याचे नाव मोझेस कॅव्हेंडिशीच्या नावावर ठेवले गेले आहे आणि १८३० मध्ये चॅट्सवर्थ हाऊस, यूके येथे ही जात प्रथम वाढली होती.

Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Datta Bargaje
सकारात्मकतेकडे बीडची दोन पावले !
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
February 2025 Grah Gochar
फेब्रुवारीमध्ये सुर्यासह ४ ग्रह करणार गोचर! ‘या’ ५ राशीच्या लोकांना मिळणार राजयोगासारखे सुख, चहुबाजुंनी मिळणार यश
makar Sankranti loksatta
काळाचे गणित : करी डळमळ भूमंडळ
Republic Day Quiz 2025 quiz five questions about General Knowledge 26 January Information Gk
Republic Day Quiz 2025: २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? या आणि अशाच काही रंजक प्रश्नांची द्या झटपट उत्तरं!

औषधं न खाताही मधुमेहावर मिळवायचे आहे नियंत्रण? ‘या’ बियांचा आहारातील समावेश ठरेल गुणकारी

भारताविषयी बोलायचे झाले तर येथे केळीच्या ३३ जाती आढळतात. यापैकी १२ प्रकार अतिशय चवदार मानले जातात. या स्वादिष्ट प्रकारांमध्ये वेलची किंवा येलक्की केळीचाही समावेश होतो. ही लहान आकाराची केळी अतिशय गोड आणि पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. तसेच, दक्षिण भारत, बिहार आणि झारखंडमध्ये रस्थाली केळीची लागवड केली जाते. हे मध्यम आकाराचे केळे आहे. याशिवाय पूवन, भिंडी केळी, भीम कोळ, नंदन, थेला चक्करकेली आणि कर्पूरवल्ली या जातीही स्वादिष्ट आहेत.

मधुमेहाच्या रूग्णांनी थोडीशी हिरवी केळी खाणे केव्हाही चांगले असते कारण त्यांचा जीआय पिकलेल्या केळ्यांच्या तुलनेत कमी असतो. जर तुमच्या शरीरात पोटॅशियमची पातळी कमी असेल, तर तुमचे शरीर कमी इंसुलिन तयार करेल, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल. आपण केळी रोज खाऊ शकतो. शरीराचे वजन वाढवण्यात आणि पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यात याचा मोठा हातभार असतो. तुम्ही दररोज १ किंवा २ केळी खाऊ शकता. मात्र, यापेक्षा जास्त केळी खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

तुम्हीही ‘या’ पद्धतीने पाणी पिता का? आजच करा सवयीमध्ये बदल; अन्यथा होऊ शकते नुकसान

केळीचे दुष्परिणाम खूप कमी आहेत. तथापि, अधूनमधून केळी खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस, पेटके उठणे, मऊ मल, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. मोठ्या प्रमाणात केळी खाल्ल्याने रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढू शकते. त्याचबरोबर काही लोकांना केळी खाण्याची अ‍ॅलर्जी देखील होते.

आयुर्वेदानुसार केळी खाल्ल्यानंतर झोपणे चांगले नाही. असे केल्याने कफ जमा होऊन आपला घास बंद होऊ शकतो. याशिवाय केळी हे एक जड फळ आहे आणि ते पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ते रात्री खाऊ नये. याचे कारण म्हणजे रात्रीच्या वेळी आपली चयापचय क्रिया सर्वात कमी असते.

सुपर फूड म्हणून ओळखले जाणारे केळे भूक शमवते आणि पचनासाठी चांगले असते. तथापि, केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. अशा स्थितीत रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने आपल्या रक्तातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची पातळी असंतुलित होऊ शकते.

तुम्हालाही सतत जाणवतो थकवा? जाणून घ्या यामागील कारणे आणि थकवा घालवण्याचे उपाय

या फळाला कधीच किड लागत नाही, ही या फळाची खासियत आहे. यात सायनाईट नावाचे रासायनिक तत्व असल्याने या फळाला कधीच किड लागत नाहीत. पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि विविध अँटीऑक्सिडंट्स देखील यामध्ये आढळतात, ज्यामुळे आपले शरीर फिट राहते.

Story img Loader