स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) खात्यांच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांना सतर्क करते. आता बँकेने वापरकर्त्यांना सुरक्षिततेशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. यासोबतच देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणार्‍या या बँकेकडून ग्राहकांना ‘स्टे सेफ विथ एसबीआय’ असे निर्देशही देण्यात आले आहेत. यासंबंधी माहिती देताना, वापरकर्त्यांना कोणत्याही संदेशावर कधीही प्रतिक्रिया न देण्याचा आणि त्याची सत्यता देखील तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका ट्विटद्वारे एसबीआयने म्हटले आहे की –

  • खाते सुरक्षित ठेवण्यासाठी, कोणालाही तुमच्या खात्यात प्रवेश करू देऊ नका. कोणालाही तुमच्या खात्यात प्रवेश करायला परवानगी देण्यापूर्वी, तुमच्यासोबत फसवणूक तर होत नाही ना, याची खात्री करून घ्या.
  • शंका असल्यास, ताबडतोब सावध व्हा आणि सत्यता पडताळल्यानंतर बँकेला कळवा. एसबीआयने सांगितले, “तुमच्या खात्यातील अ‍ॅक्टिव्हिटीचे निरीक्षण करण्यासाठी तुमचे मेसेज तपासा.”
  • अज्ञात ठिकाणाहून असा कोणताही संदेश आल्यास खातेदारांनी त्यावर कोणतेही उत्तर देऊ नये, असे बँकेने म्हटले आहे. तसेच त्याची सत्यता तपासली पाहिजे.
  • बँक फक्त SBIBNK, SBIINB, SBIPSG, SBYONO या शॉर्टकोडसह ग्राहकांना मेसेज पाठवते. जर तुम्हाला या कोड्सवरून मेसेज मिळाला तर त्याचा अर्थ असा आहे की हा बँकेचा अधिकृत मेसेज आहे.
  • याशिवाय, बँकेने ग्राहकांना सतर्क केले आहे की त्यांनी कधीही कोणत्याही अज्ञात स्त्रोताकडून आलेल्या संदेशांना उत्तर देऊ नये.
  • बँकेने वेबसाइटवर कळवले आहे की, टेक्स्ट मेसेज किंवा फोन कॉलद्वारे कधीही कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका, ज्यामध्ये खाते क्रमांक, पासवर्ड किंवा संवेदनशील माहिती असू शकते. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here are some special tips from sbi to make your bank account more secure find out pvp