कडुलिंबाच्या पानांच्या सेवनाने आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होतात. त्वचेशी संबंधित समस्यांपासून ते मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांमध्येही कडूलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास फायदेशीर मानले जाते. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचा काढा बनवा आणि प्या. कडुलिंबाच्या काढयाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास चयापचय वाढतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाचा काढा प्या
कडुलिंबाच्या पानांमध्ये वजन कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. कडूलिंबापासून बनवलेल्या काढयाचे सेवन केल्यास खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. हा काढा प्यायल्याने शरीरात चरबी जमा होत नाही आणि चयापचय देखील गतिमान होतो.
कडुलिंबाचा काढा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तसेच यात मध मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम होते. वजन कमी करण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणे आवश्यक आहे. त्यामुळे कडुलिंबाचा काढा हा फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या काढयात लिंबाचा रस आणि मध मिसळून देखील पिऊ शकता.
काढूलिंबाचा काढा कसा बनवायचा?
कडुलिंबाचा काढा बनवण्यासाठी काही ताजी कडुलिंबाची पाने घ्या.
पाने स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे स्वच्छ करा.
आता दोन ते तीन ग्लास पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवा.
पाण्याला उकळी आली की पाण्यात कडुलिंबाची पाने टाका.
चांगले उकळू द्या.
त्यात आले आणि काळी मिरी घाला.
एक ग्लासाएवढे पाणी शिल्लक राहिले की गॅस बंद करा.
तयार झालेला काढा स्वच्छ सुती कापडाने गाळून घ्या.
या काढयात लिंबाचा रस आणि मध मिसळून त्याचे सेवन करा.
रिकाम्या पोटी या काढयाचे सेवन केल्यास फायदा होईल. ते प्यायल्यानंतर तासभर काहीही खाऊ किंवा पिऊ नका.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा आणि क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)