लॉकडाउनमुळे सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. त्यामुले स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वापर जास्त झाल्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. अशावेळी मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर काहींचा स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही. स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगाणर आहोत. ज्यामध्ये स्मार्टफोन लवकर चार्ज न होण्याचं कारण असू शकते….
खराब अॅडेप्टर किंवा केबल –
कधी कधी स्मार्टफोन संथ गतीने चार्ज होण्याचं कारण चार्जर असू शकतो. त्यामुळे स्मार्टमान खराब झाला असं ग्रहित धरण्यापेक्षा अडेप्टर किंवा चार्जर बदलून पाहावा. शक्यतो स्मार्टफोनसोबत आलेल्या चार्चरनेच मोबाइल चार्ज करावा. जर मोबाइलसोबत आलेला चार्जर खराब झाला असेल तर ओरिजनल चार्जर विकत घ्यावा.
पावर सोर्स –
स्लो चार्जिंगसाठी प्रत्येकवेळा चार्जर केबल किंवा अॅडेप्टरला दोषी धरू शकत नाही. असेही असू शकते की तुम्ही चार्जिंगसाठी कुमकुवत पॉवर सोर्सचा वापर करत असाल. किंवा तुम्ही वायरलेस चार्जरचा वापर करत असाल तर तुम्हाला वायरवाला चार्जर वापरायची गरज आहे. सॅमसंगसारख्या कंपनीचा वेगवान वायरलेस चार्जरसुद्धा रेग्यूलर चार्जरपेक्षा संथ गतीने मोबाइल चार्ज होतो.
रनिंग अॅप क्लिअर करा –
बॅग्राऊंडला अॅप्लिकेशन सुरू राहिल्यास मोबाईलच्या मेमरीवरही जास्त भार येतो आणि बॅटरीही वापरली जाते. मोबाइल चार्ज संथ गतीने होण्यास हेही एक कारण असू शकते. मोबाइलमध्ये कायम आपलं काम झाल्यानंतर रनिंग अॅप्लिकेशन क्लिअर करावं.
खराब यूएसबी पोर्ट –
सर्व करूनही तुमचा फोन संथ गतीने चार्ज होत असेल तर तुमचा यूएसबी पोर्ट खराब झालेला असू शकतो. स्मार्टफोनच्या आधिककाळ वापर केल्यानंतर यूएसबी पोर्टमध्ये धूळ गेलेली असू शकते. किंवा खराब झालेलं असू शकते. एकदा यूएसबी पोर्ट साफ करून घ्या. किंवा स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये दाखवून यूएसबी पोर्ट खराब झालं असेल तर रिप्लेस करा.
खराब बॅटरी –
मोबाईलमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी. बॅटरी संपली की मोबाईवर काहीच करता येत नाही. सध्याच्या नव्या मोबाईलमध्ये आता लीथीयम आयन बॅटरीचा वापर केल्यानं आधीच्या तुलनेत ती जास्त टिकून राहण्यास मदत होते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचं लाईफ आणखी वाढून उत्तम परफॉर्मेंस देऊ शकते.
मोबाईल किंवा बॅटरी जास्त गरम होऊ देऊ नका –
तुमचा स्मार्टफोन अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान कमी असेल. अतितापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो. तुमचा फोन टीव्ही किंवा फ्रीजवर ठेवू नका ज्यामुळे त्याच्या बॅटरीवरही परिणाम होतो. उन्हामध्ये फोन गरम होतो अशावेळी बाहेर असाल आणि फोन जास्त गरम झाला असेल तर फोन काहीवेळ आवश्यकता नसल्यास बंद ठेवा त्यामुळे बॅटरी नॉर्मवर येण्यास मदत होते.