नववर्षाची चाहूल आता सर्वांनाच लागली आहे. अनेकांची नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाली असेल. कोणी नववर्षानिमित्त फिरायला जायचा प्लॅन करत आहे, कोणी पार्टी करण्याचा प्लॅन करत आहे. नववर्षाचा आनंद साजरा करताना लोक उत्साहात भरपूर मद्यपान करतात, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा हँगओव्हर होतो तेव्हा काही सुचत नाही. अनेकांना दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस असते, पण आदल्या रात्री केलेल्या पार्टीचा हँगओव्हर उतरत नाही. कोणाला डोकेदुखी होत असते तर कोणाच्या पोटात दुखते. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला हँगओव्हर उतरवण्यासाठी सोपे उपाय सांगणार आहोत, जे वापरून तुम्हाला पटकन बरे वाटेल.
द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान दिवसभरात किमान ८-१० ग्लास (६४-८० औंस) पाणी पिऊन हायड्रेटेड राहण्याची शिफारस केली आहे. विशेषत: जर तुम्ही मद्यपानचे सेवन करणार असाल, तर ते शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्यापासून रोखण्यासाठी मदत करेल.
मद्यपान करण्याआधी तुम्ही भरपूर पाणी प्यायले नसेल तरी काळजी करू नका. अशा स्थितीतही मदत करण्यासाठी आमच्याकडे काही उपाय आहेत!
हँगओव्हर उतरवण्यासाठी सिंघवाल यांनी पुढील काही उपाय सुचवले आहेत.
१. पाणी किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय प्या
स्पोर्ट्स ड्रिंक्स किंवा नारळ पाणी यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध पेय प्या आणि शरीरातील इलेक्टॉलाइटचे प्रमाण पुन्हा संतुलित करा. हे केवळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करत नाही, तर मद्यपानामुळे कमी होणारी अत्यावश्यक खनिजेदेखील भरून काढतील.
२. कर्बोदकांमध्ये प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचे सेवन करून संतुलित आहार घ्या.
संतुलित आहार घेण्याची कल्पना सर्वात आकर्षक नसली, तरी पोषक घटकांनी समृद्ध नाश्ता केल्यास भरपूर फायदा मिळू शकतो. पोटासाठी सहज पचेल असे अन्न निवडा. जसे की धान्य, फळे आणि लीन प्रोटिन्स. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास आणि आवश्यक ऊर्जा पुरवण्यास मदत करू शकते.
हेही वाचा – हिवाळ्यात येणारा हार्ट अटॅक टाळण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे फायदेशीर ठरेल का?
३. शिफारस केलेल्या डोसचे पालन करून, वेदना कमी करणारे औषध सावधगिरीने घ्या.
डोकेदुखी आणि स्नायू दुखणे कमी करण्यास मदत करू शकतात, असे आयबुप्रोफेन किंवा अॅस्पिरिनसारखे औषध मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपनशिवाय मिळतात. पण, अॅसिटामिनोफेनचे औषध घेताना सावधगिरी बाळगा, कारण मद्याबरोबर त्याचा संपर्क आल्यास ते तुमच्या यकृतासाठी हानिकारक ठरू शकते. नेहमी शिफारस केलेल्या डोसानुसारच औषधाचे सेवन करा.
४. शरीराला पूर्ण बरे वाटण्यासाठी पुरेशी विश्रांती द्या.
तुम्हाला शक्य असले तरी काही तास जास्त झोप घेऊ शकता. विश्रांती हा शरीराला पूर्ण बरे करण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपल्या शरीराला तंदुरुस्त होण्यासाठी आवश्यक वेळ दिल्याने हँगओव्हर बरे होण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते.
५. आणखी मद्यपान करणे टाळा
हँगओव्हर टाळण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे संयमाने मद्यपान करणे. पाण्याबरोबर मद्यपान करा, मद्यापानापूर्वी काहीतरी खा आणि आपल्या मर्यादा ओळखून मद्यपान करा. मद्यपान केल्यानंतर तुमच्या शरीराचा प्रतिसाद समजून घेतला तर भविष्यातील हँगओव्हर टाळण्यासाठी खूप मदत करू शकते.
हेही वाचा – सारखं काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होतेय? डॉक्टरांकडून जाणून घ्या उपाय
येथे दोन हँगओव्हर उतरवणारे ड्रिक्स कसे बनवायचे ते सांगितेल आहेत, जी तुम्ही वापरून पाहू शकता.
नारळ पाणी आणि अननस रस
- नारळ पाणी आणि अननसाचा रस समान प्रमाणात मिसळा.
- नारळाचे पाणी शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यास मदत करते, तर अननसाचा रस जीवनसत्त्वे पुरवातात.
- हे ताजे, हायड्रेटिंग पेय बर्फ टाकून प्या.
आले, पुदिना, लिंबू पाणी
- आल्याचे ताजे तुकडे, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस एकत्र करा.
- गोडपणासाठी पाणी आणि मध घाला.
- आले पचनास मदत करते, पुदिना पोटाला शांत करते आणि लिंबू जीवनसत्त्वे पुरवते.