Hero Motocorp ने भारतीय बाजारात BS6 मानकांसहीत Hero HF Deluxe ही बाइक आणली आहे. कंपनीने ही बाइक दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध केली आहे. नवीन एचएफ डीलक्सच्या सेल्फ-स्टार्ट अ‍ॅलॉय-व्हिल व्हेरिअंटची किंमत 55 हजार 925 रुपये आणि सेल्फ-स्टार्ट अ‍ॅलॉय-व्हिल i3S व्हेरिअंटची किंमत 57 हाजर 250 रुपये आहे. या दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत.

या बाइकवर नवीन ग्राफिक्स देण्यात आलेत. बाइकमध्ये ‘एक्ससेन्स’ तंत्रज्ञानासह फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनामुळे बाइकला 9% अधिक मायलेज आणि उत्तम अ‍ॅक्सलरेशन मिळेल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. या बाइकमध्ये 97.2 सीसी क्षमतेचे इंजिन असून हे अद्ययावत इंजिन 8000 आरपीएमवर 7.94 बीएचपी ऊर्जा आणि 6000 आरपीएमवर 8.05 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. नवीन एचएफ डीलक्स बाइकला हिरोच्या जयपूर येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब, सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलजीमध्ये डिझाइन आणि डेव्हलप करण्यात आलंय. याशिवाय ही बाइक आता एकूण पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात ब्लॅक आणि रेड, ब्लॅक आणि पर्पल, ब्लॅक आणि ग्रे आणि टेक्नो ब्ल्यू आणि हेवी ग्रेसह ग्रीन या नव्या रंगांचा समावेश आहे.

Jio Diwali Dhamaka offers free One year Jio AirFiber subscription to users
Diwali Dhamaka : रिलायन्सची युजर्सना दिवाळी भेट! वर्षभराचे सबस्क्रिप्शन देणार मोफत; तुम्हाला होईल का फायदा?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Reliance Jio provides offers a range of prepaid data booster plans to keep users connected without interruptions checkout list
Jio Down: जिओचं नेटवर्क पुर्वरत, तांत्रिक अडचण दूर; दरम्यान सोशल मीडियावर मुकेश अंबानी ट्रोल
iOS 18 roll out Today In India
iOS 18 update : आज रात्री आयफोन होणार अपडेट; लॉक, हाईड ॲप्ससह असणार फीचर्स; ‘या’ यादीत तुमच्या फोनचं नाव आहे का बघा
job opportunities in irdai
नोकरीची संधी : ‘आयआरडीएआय’मधील संधी
Why Apple is intelligent about its use of Apple Intelligence in the new iPhone 16 series
नव्या iPhone 16मध्ये Appleने कसा केला Apple Intelligenceचा वापर? जाणून घ्या…
How When and Where to Watch Apple iPhone 16 Launch Event
Apple iPhone 16 Launch Event 2024 : अवघे काही तास! ॲपल इव्हेंट येथे पाहता येणार लाईव्ह; आयफोन १६ सह ‘ही’ दोन प्रोडक्ट होणार लाँच
iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max
iPhone 16 Pro Max vs iPhone 15 Pro Max: आयफोन १६ साठी खर्च करणे किती फायद्याचे? पाहा ‘हे’ चार फीचर्स

आणखी वाचा – JAWA ची नवीन बाइक Perak, 10 हजारात बुकिंगला सुरूवात

यापूर्वी कंपनीने स्प्लेंडर आयस्मार्ट ही बाइक BS6 मानकांसह लाँच केली होती. ही कंपनीची पहिली बीएस-6 बाइक ठरली. त्यानंतर लगेचच कंपनीने एचएफ डिलक्स अपग्रेड करुन बाजारात आणली. लवकरच कंपनीची उर्वरित उत्पादनेही BS6 अपग्रेड केली जाणार आहेत.