Hero Motocorp ने भारतीय बाजारात BS6 मानकांसहीत Hero HF Deluxe ही बाइक आणली आहे. कंपनीने ही बाइक दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध केली आहे. नवीन एचएफ डीलक्सच्या सेल्फ-स्टार्ट अ‍ॅलॉय-व्हिल व्हेरिअंटची किंमत 55 हजार 925 रुपये आणि सेल्फ-स्टार्ट अ‍ॅलॉय-व्हिल i3S व्हेरिअंटची किंमत 57 हाजर 250 रुपये आहे. या दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बाइकवर नवीन ग्राफिक्स देण्यात आलेत. बाइकमध्ये ‘एक्ससेन्स’ तंत्रज्ञानासह फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनामुळे बाइकला 9% अधिक मायलेज आणि उत्तम अ‍ॅक्सलरेशन मिळेल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. या बाइकमध्ये 97.2 सीसी क्षमतेचे इंजिन असून हे अद्ययावत इंजिन 8000 आरपीएमवर 7.94 बीएचपी ऊर्जा आणि 6000 आरपीएमवर 8.05 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. नवीन एचएफ डीलक्स बाइकला हिरोच्या जयपूर येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब, सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलजीमध्ये डिझाइन आणि डेव्हलप करण्यात आलंय. याशिवाय ही बाइक आता एकूण पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात ब्लॅक आणि रेड, ब्लॅक आणि पर्पल, ब्लॅक आणि ग्रे आणि टेक्नो ब्ल्यू आणि हेवी ग्रेसह ग्रीन या नव्या रंगांचा समावेश आहे.

आणखी वाचा – JAWA ची नवीन बाइक Perak, 10 हजारात बुकिंगला सुरूवात

यापूर्वी कंपनीने स्प्लेंडर आयस्मार्ट ही बाइक BS6 मानकांसह लाँच केली होती. ही कंपनीची पहिली बीएस-6 बाइक ठरली. त्यानंतर लगेचच कंपनीने एचएफ डिलक्स अपग्रेड करुन बाजारात आणली. लवकरच कंपनीची उर्वरित उत्पादनेही BS6 अपग्रेड केली जाणार आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero hf deluxe launched in india know price and all details sas
Show comments